गेट अंगावर कोसळून चिमुकलीचा मृत्यू

By Admin | Updated: June 23, 2017 01:10 IST2017-06-23T01:10:07+5:302017-06-23T01:10:07+5:30

रत्नागिरी एमआयडीसीतील घटना

Gate collapses on the body of a sperm and dies | गेट अंगावर कोसळून चिमुकलीचा मृत्यू

गेट अंगावर कोसळून चिमुकलीचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : लोखंडी गेट अंगावर कोसळून तीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास एमआयडीसी परिसरात घडली़ लक्ष्मी शरणाप्पा मॅगेरी (एमआयडीसी मिरजोळे) असे तिचे नाव आहे.
शरणाप्पा मॅगेरी यांची लक्ष्मी ही एकुलती कन्या गुरुवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास आपल्या घराशेजारी मुलांसोबत खेळत होती़ ही चिमुकली बाजूला असलेल्या एका प्लॉटजवळ खेळत गेली़ त्या प्लॉटच्या लोखंडी गेटजवळ ती खेळत होती आणि ते गेट त्याच्या आधाराच्या भिंतीसह खाली कोसळले. लक्ष्मी त्या गेटखाली चिरडली गेली़
तिथे खेळत असलेल्या मुलांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली़ त्यामुळे नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली़ लक्ष्मीच्या अंगावर पडलेले गेट बाजूला केले. तिला मुक्कामारही लागला होता़ तिच्या वडिलांनी तत्काळ तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले़ मात्र, तोवर तिची प्राणज्योत मालवली होती. या घटनेची नोंद ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Web Title: Gate collapses on the body of a sperm and dies