शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
4
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
5
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
6
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
7
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
8
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
9
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
10
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
11
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
12
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
13
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
14
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
15
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
16
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
17
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
18
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
19
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
20
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
Daily Top 2Weekly Top 5

वायूच्या वासाने चौघे गुदमरले

By admin | Updated: November 21, 2015 23:58 IST

रत्नागिरीतील घटना : महिलांच्या सतर्कतेने जीवित हानी टळली

रत्नागिरी : वायूच्या रिकाम्या टँकरची साफसफाई करत असताना वायूच्या वासाने चौघे गुदमरुन बेशुद्ध झाल्याची घटना शनिवारी सकाळी रत्नागिरीतील मिरकरवाडा परिसरातील एस. केअर मरीन कंपनीनजीक घडली. या चौघांवरही जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरु आहेत. रात्री उशिरापर्यंत टँकरमध्ये कोणत्या प्रकारचा वायू होता हे समजू शकले नाही. शनिवारी सकाळी टँकर (एमएच ०९ बीसी ५०००) हा मिरकरवाडा परिसरातील एस. केअर या मरीन कंपनीनजीक उभा होता. टँकरची आतून सफाई करण्यासाठी प्रसाद उर्फ बबलू जगदीश बिर्जे (३२), अलिसाब मगदूम पटेल (३२, दोघेही रा. मुरुगवाडा), संतोष रमेश राठोड (३०, भगवती बंदर) व शरीफ चांदसाब पटेल (३२, मुरुगवाडा) हे उतरले होते. टँकरचे दोन कप्पे धुवून झाले असता जगदीश, अलिसाब व संतोष हे टँकरच्या तिसऱ्या कप्प्यामध्ये उतरले या कप्प्यामध्ये वायू शिल्लक असल्याने तिघेही तेथेच गुदमरुन बेशुद्ध पडले. बराच काळ हे तिघेही बाहेर न आल्याने शरीफ पटेल त्यांना पाहण्यासाठी या कप्प्यामध्ये उतरला असता तोही बेशुद्ध पडला. ही गोष्ट तेथीलच महिलांच्या लक्षात आल्यावर त्यांनी परिसरातील नागरिकांना याची कल्पना दिली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने या चारही जणांना बाहेर काढण्यात आले. (वार्ताहर)