गणपतीपुळे समुद्रकिनारी वृद्धाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:34 IST2021-04-09T04:34:08+5:302021-04-09T04:34:08+5:30
गणपतीपुळे : गणपतीपुळे समुद्रकिनारी एक ७० वर्षीय वृद्ध बेशुद्धावस्थेत आढळला. त्याला येथील जीवरक्षकांच्या साहाय्याने मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ...

गणपतीपुळे समुद्रकिनारी वृद्धाचा मृत्यू
गणपतीपुळे : गणपतीपुळे समुद्रकिनारी एक ७० वर्षीय वृद्ध बेशुद्धावस्थेत आढळला. त्याला येथील जीवरक्षकांच्या साहाय्याने मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे घेऊन गेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. भीमगोंडा शंकर पाटील (७०, कबनूर इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे.
मोरया चौकाजवळ शोष खड्डानजीक ते बेशुद्धावस्थेत आढळून आले. गणपतीपुळे पोलीस पाटील विश्वनाथ पाटील यांनी पोलीस दूरक्षेत्र गणपतीपुळे येथे ही माहिती दिल्यानंतर दूरक्षेत्राच्या पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सागर गिरीगोसावी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाटील यांना लगेचच मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. त्या ठिकाणी नेल्यानंतर त्यांना तपासून तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.
या घटनेची खबर मिळताना गणपतीपुळे सरपंच कल्पना पकये, उपसरपंच महेश केदार, सदस्य यांनी घटनास्थळी भेट देऊन सहकार्य केले. तसेच पाटील यांना आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी ग्रामपंचायत गणपतीपुळेच्या जीवरक्षकांनी पुढाकार घेतला. मालगुंड आरोग्य केंद्रामध्ये सध्या महिला वैद्यकीय अधिकारी असून त्यामुळे विच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे मृतदेह पाठवण्यात आला. मालगुंड आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी मिळणे गरजेचे आहे. या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करून अधिक तपास गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्राच्या पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील व पोलीस कॉन्स्टेबल सागर गिरीगोसावी करत आहेत.
चौकट
विषप्राशन केल्याचा अंदाज
भीमगोंडा शंकर पाटील यांनी विष प्राशन केले असावे असा प्राथमिक अंदाज असून त्यांच्या तोंडावाटे फेस व उलटी केल्याचे दिसून येत होते. त्यांच्या खिशात सापडलेल्या डायरीवरून नातेवाइकांजवळ संपर्क करण्यात आला असून काही महिन्यांपूर्वीच त्यांच्यावर बायपास सर्जरी झाल्याचे नातेवाइकांनी सांगितले. तसेच ते मंगळवारी ६ तारखेला घरातून बाहेर पडले होते. बुधवारी सायंकाळी उशिरा गणपतीपुळे गावात आले असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे.