शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत तरुणाकडे सापडला ब्राऊन हिराेईनसह गांजा

By अरुण आडिवरेकर | Updated: April 1, 2023 15:55 IST

रेल्वे स्थानक परिसरात गांजा घेऊन विक्रीसाठी थांबला होता

रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वे स्थानकानजिक असलेल्या कोकण प्लाझा समोर ब्राऊन हिरोईन या अंमली पदार्थासह गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला रत्नागिरी शहर पाेलिसांच्या पथकाने अटक केली आहे. साहिल हनिफ मेमन (२५, रा. झारणीरोड बाजारपेठ, रत्नागिरी) असे त्याचे नावे आहे.

त्याच्याकडून सुमारे ६१,४४० रुपयांचे ब्राऊन हिरोईन व १० हजार रुपयांचा गांजा असा ७१,४४० रुपयाचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. तर साहिल मेमन याला अटक करण्यात आली असून, तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.शहर पोलिसांचे गस्ती पथक पोलिस स्थानकाच्या हद्दीत तपासणी करत असताना गुरुवारी (दि.३०मार्च) रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. रेल्वे स्थानक परिसरात साहिल मेमन दुचाकीला लावलेल्या पिशवीत सुमारे ११ ग्रॅम वजनाचे ६१,४४० रुपये किंमतीचे ब्राऊन हिरोईन व ५१० ग्रॅम वजनाचा गांजा घेऊन विक्रीसाठी थांबला होता.

पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडील ७१,४४० रुपयांचे अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहे. त्याचबराेबर त्याच्याकडील १५ हजार रुपयांची हाेंडा कंपनीची दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.साहिल मेमेन याच्या विरोधात एनडीपीएस कलम ८ (क) २० (ब) नुसार काल, शुक्रवारी  त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस