शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेला चौसोपीचा गणेशोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 16:45 IST

सचिन मोहिते देवरुख : तब्बल साडेतीनशे वर्षांची ऐतिहासिक गणेशोत्सवाची परंपरा लाभलेल्या व दृष्टांतातून साकारलेल्या देवरुख शहरातील वरचीआळी येथील चाैसाेपीतील ...

सचिन मोहितेदेवरुख : तब्बल साडेतीनशे वर्षांची ऐतिहासिक गणेशोत्सवाची परंपरा लाभलेल्या व दृष्टांतातून साकारलेल्या देवरुख शहरातील वरचीआळी येथील चाैसाेपीतील जोशी कुटुंबीयांच्या घरी साजरा हाेणारा गणेशोत्सव आगळावेगळा असा आहे. मोरगावच्या मयुरेश्वराप्रमाणे साजरा होणारा हा गणेशोत्सव ‘चाैसाेपीचा गणेशाेत्सव’ म्हणून प्रसिद्ध आहे. आजही नवव्या पिढीतील जोशी कुटुंबीय हा उत्सव साजरा करत आहेत. या उत्सवाला १६ सप्टेंबरपासून प्रारंभ झाला.

जोशी घराण्याचे मूळचे बाबा जोशी या एका असाध्य आजाराने पछाडले हाेते. अनेक उपचारानंतरही गुण न आल्याने ते संपूर्ण कुटुंबाचा त्याग करून नजीकच्या देव-धामापुरातील श्रीदेव शंकराच्या देवळात राहण्यास गेले आणि देवाची सेवा करू लागले. त्यावेळी त्यांना ‘‘तू तेथे राहू नकोस, मोरगावला जा आणि मयुरेश्वराची सेवा कर’’ असा दृष्टांत झाला. असाध्य आजारातही त्यांनी मोरगाव गाठले आणि मयुरेश्वराची तपश्चर्या केली. त्यात ते कित्येक दिवस कडुनिंबाच्या रसावर राहिले, पण काही फरक न पडल्याने आमरण सेवेची तपश्चर्या सुरू केली.

त्यानंतर आश्चर्ययुक्त त्यांची व्याधी काही क्षणात नाहीशी झाली. ‘‘तू राहत असलेल्या देवळाच्या खोलीतील ओटीवर खोदाई कर आणि जे काही मिळेल, ते घरी घेऊन जा,’’ असा पुन्हा दृष्टांत झाला. या दृष्टांताप्रमाणे त्यांनी ओटीजवळ खोदले; मात्र हाती काहीच लागले नाही. ते खिन्न झाले आणि त्यांनी अन्न त्यागाचाच निश्चय केला. त्यावेळी पुन्हा दृष्टांत झाला ‘‘तुझी खोदाईची जागा चुकली आहे. मी पिढ्यानपिढ्या तुझ्या घरी राहणार आहे.’’बाबांनी पुन्हा योग्य जागी खोदाई केली असता, चांदीच्या डब्यात चांदीची श्री सिद्धिविनायकाची उभ्या स्थितीतील उजव्या सोंडेची चार इंच उंचीची चतुर्भुज मूर्ती मिळाली.

या मूर्तीच्या उजव्या हातात पारा आहे. मागील डाव्या हातात परशू, पुढच्या हातात दंड तर डाव्या हातात मोदक आहे. गळ्यात यज्ञोपवितार्थं नाम आहे, डोक्याला मुकुट आहे. पितळी सिंहासनावर कमळामध्ये मूर्ती उभी असून सिंहासनाच्या दोन्ही बाजूला सिंह, त्यावर पाचकणी नागाचे छत्र आहे. सिंहासन ८ इंच उंचीचे आहे. ज्या चांदीच्या डब्यात मूर्ती मिळाली, तो डबाही आज पूजेपुढे पाहावयास मिळत आहे.मयुरेश्वरप्रमाणे उत्सव‘‘मूर्ती घरी घेऊन जा आणि उत्सव कर’’, या दृष्टांताप्रमाणे बाबांनी देवरुखचे घर गाठले. मोरगावच्या मयुरेश्वर उत्सवाप्रमाणे दृष्टांतातून मिळालेल्या मूर्तीवर उत्सवाची परंपरा सुरू केली. गेली ९ पिढ्या हा उत्सव अव्याहतपणे सुरू आहे. सर्वसाधारणपणे गणेशतुर्थीला गणेशोत्सव सुरू होतो. मात्र, हा उत्सव भाद्रपद शुद्ध प्रतिपदेस सुरू होतो आणि भाद्रपद शुद्ध पंचमीला उत्सवाची सांगता होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीGanesh Mahotsavगणेशोत्सव