शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Ganeshotsav : कोकण रेल्वे प्रशासन गणेशोत्सवासाठी सज्ज, २०० फेऱ्यांचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 11:55 IST

कोकणात मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी येणाऱ्या लाखो गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी कोकण रेल्वेने गणेशोत्सव काळात कोकण रेल्वे मार्गावर सुमारे २०० फेऱ्यांचे नियोजन केले आहे.

ठळक मुद्देकोकण रेल्वे प्रशासन गणेशोत्सवासाठी सज्जकोकण रेल्वे मार्गावर २०० फेऱ्यांचे नियोजन

रत्नागिरी : कोकणात मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठीकोकण रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी येणाऱ्या लाखो गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी कोकण रेल्वेने गणेशोत्सव काळात कोकण रेल्वे मार्गावर सुमारे २०० फेऱ्यांचे नियोजन केले आहे.

कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण आधीच संपल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मार्गावरून धावणाऱ्या सर्वच गाड्यांच्या बोगींची संख्या २ ते ४ ने वाढविण्यात आली आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार अजूनही काही फेऱ्या वाढविण्याची शक्यता आहे.कोकण रेल्वेने २०१८च्या गणेशोत्सवासाठी सुरूवातीला सुमारे दीडशे जादा फेऱ्यांचे नियोजन केले होते. तरीही हजारो लोकांना आरक्षण मिळाले नाही. त्यामुळे गणेशोत्सव फेऱ्यांची संख्या वाढवून १८३ करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या आटोक्यात येत नसल्याने रेल्वेफेऱ्यांची संख्या आता सुमारे २००पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच मार्गावरून धावणाऱ्या अनेक गाड्यांच्या बोगींची संख्याही गणेशोत्सव काळात वाढविण्यात आली आहे. त्यामुळे गणेशभक्तांमधून समाधान व्यक्त होत आहे.यंदा १३ सप्टेंबरला गणेशोत्सव सुरू होणार आहे. कोकणात घरोघरी श्री गणेशाची पूजा-अर्चा केली जाते. गणेशोत्सव हा कोकणचा दिवाळी सण म्हणून ओळखला जातो. त्यामुळे अर्धी मुंबई या सणासाठी कोकणात उतरते, असे म्हटले जाते. या सणासाठी मुंबईत नोकरी-व्यवसाय करणारे कोकणवासीय मोठ्या संख्येने मिळेल त्या वाहनाने कोकणात येतात.

पहिल्या पाच दिवसात गणेशोत्सव साजरा होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यानंतर ९, ११ व १३ दिवसांसाठी गणपतींचे वास्तव्य असते. या काळात कोकण रेल्वेकडून प्रवासी वाहतूक व्यवस्था चांगल्याप्रकारे केली जाते. रेल्वेने गणेशोत्सवासाठी येणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे.कोकण रेल्वे सुरक्षितकोकण रेल्वेमार्ग अद्यापही एकेरी आहे. त्यामुळे परस्पर विरोधी दिशेने येणाऱ्या गाड्यांना एकेरी मार्गावरून बाजू देताना बराचवेळ जातो. गणेशोत्सव काळात गाड्या उशिराने धावण्याची समस्या निर्माण होते. परंतु, कोकण रेल्वेची वाहतूक सुरक्षित असल्याने व रस्तेमार्गाच्या तुलनेत कोकण रेल्वेने गणेशोत्सवात प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आतापासूनच रेल्वे फुल्ल झाली आहे.जलद गाड्यांनाही थांबेकोकण रेल्वेने गणेशोत्सव काळात केलेल्या जादा रेल्वे फेऱ्यांना प्रवाशांच्या सोईसाठी कोकणात बहुतांश स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल, पुणे येथून रत्नागिरी, सावंतवाडी, थिवीम, मडगाव दरम्यान जादा रेल्वे फेऱ्या धावणार आहेत. जलद गाड्यांच्या थांब्यांमध्येही उत्सवकाळासाठी वाढ करण्यात आली आहे.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवRatnagiriरत्नागिरीKonkan Railwayकोकण रेल्वे