शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: आई-वडील हजयात्रेवरुन आल्यावर ‘त्या’ चौघांचा दफनविधी; आरे-वारे समुद्रात बुडून झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 13:59 IST

दाेन दिवसांत जाणार हाेते मुंबईला

रत्नागिरी : शहरानजीकच्या आरे-वारे समुद्रात शनिवारी चौघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. चौघांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. उज्मा, उमेरा, जैनब यांचे आई-वडील उमरा (हजयात्रा) करण्यासाठी सौदी अरेबिया येथे गेले आहेत. ते सोमवारी रत्नागिरीत येणार असून, त्यानंतर चौघांचा दफनविधी होणार आहे.या दुर्घटनेत उज्मा शमशुद्दीन शेख (वय १८), उमेरा शमशुद्दीन शेख (२९), जैनब जुनेद काझी (२६), जुनैद बशीर काझी (३०) यांचा दुर्दैव्यारित्या बुडून मृत्यू झाला आहे. जुनैद काझी याचे मूळ गाव कसबा (ता. संगमेश्वर) येथे आहे. मात्र, व्यवसायासाठी ते ओसवालनगर येथे पत्नी जुनैब, दोन वर्षांचा लहान मुलगा व वयोवृद्ध आईसह राहत होते. शनिवारी सायंकाळी जुनैद, पत्नी जैनब, उज्मा, उमेरासह आरे-वारे येथे फिरायला गेले होते. समुद्रात भिजत असताना लाटेबरोबर पाण्यात ओढले गेले आणि चाैघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.उमेरा, उज्मा, जैनब यांच्या आणखी दोन बहिणी व एक भाऊ आहे. एक बहीण मुंबईत, तर दुसरी बहीण दुबईत असते तर भाऊ कतार येथे असतो. दुर्घटनेनंतर मुंबईतील बहीण रविवारी रत्नागिरीत दाखल झाली. मात्र, आई-वडील साैदीवरून कतार येथे गेले असून, कतारवरून मुलासह रविवारी सायंकाळी ८ वाजेपर्यंत मुंबई विमानतळावर येणार आहेत. तेथून त्यांना रत्नागिरीत आणण्यात येणार आहे. साेमवारी ते आल्यानंतर चारही मृतदेहांवर कोकणनगर येथील कब्रस्तानमध्ये दफनविधी करण्यात येणार असल्याचे काझी कुटुंबीयांच्या नातेवाइकांनी सांगितले.

दोन वर्षांचा नातू, वयोवृद्ध आजीमृत जुनैद व जैनब यांचा दोन वर्षांचा मुलगा आहे. जुनैद यांची वयोवृद्ध आई आहे. काळाने झडप घातल्याने मुलाचा व सुनेचा मृत्यू पाहण्याची वेळ आईवर आली आहे. शिवाय दोन वर्षांच्या नातवाच्या संगोपनाची जबाबदारी आली आहे. जुनैद यांची एक बहीण ओसवालनगर येथे राहते. सून व मुलगा फिरायला गेल्याने आजी नातवाला घेऊन लेकीकडे आली होती.

दाेन दिवसांत जाणार हाेते मुंबईलाजुनैद यांचे सासू-सासरे उमरा करण्यासाठी साैदी अरेबिया येथे गेले होते. ते दि. २३ रोजी मुंबईत परतणार होते. तोपर्यंत अविवाहित मुलींना जावई जुनैद व मुलगी जैनब यांच्याकडे पाठविले होते. आई-वडील येणार असल्याने उज्मा व उमेरा दोन दिवसांत मुंबईला जाणार होत्या. त्यांचे तिकीटही काढण्यात आले होते.