शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

गणवेश खरेदीसाठी निधी झाला तोकडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 12:38 IST

CoronaVirusUnlock, EducationSector, School, Ratnagirinews सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व मुली, अनुसूचित जाती, जमाती व दारिद्र्यरेषेखालील मुलगे यांना दरवर्षी मोफत दोन गणवेश देण्यात येतात. यावर्षी मात्र शासनाने एकच गणवेश देण्याचे निश्चित केले आहे. शासनाने एकाच गणवेशासाठी निधी दिला असला, तरी तो अपुरा असल्याने शिक्षण विभागाने आवश्यक निधीची मागणी केली आहे.

ठळक मुद्देगणवेश खरेदीसाठी निधी झाला तोकडारत्नागिरी जिल्ह्यातील ५५,८७७ विद्यार्थी ठरले लाभार्थी

मेहरून नाकाडेरत्त्नागिरी : सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व मुली, अनुसूचित जाती, जमाती व दारिद्र्यरेषेखालील मुलगे यांना दरवर्षी मोफत दोन गणवेश देण्यात येतात. यावर्षी मात्र शासनाने एकच गणवेश देण्याचे निश्चित केले आहे. शासनाने एकाच गणवेशासाठी निधी दिला असला, तरी तो अपुरा असल्याने शिक्षण विभागाने आवश्यक निधीची मागणी केली आहे.जिल्ह्यात एकूण ५५ हजार ८७७ विद्यार्थी असून, त्यांच्यासाठी एका गणवेशाकरिता एक कोटी ६७ लाख ६३ हजार रूपयांची आवश्यकता आहे. मात्र, राज्य शासनाकडून एक कोटी ३६ लाख ७३ हजार रूपये निधी प्राप्त झाला आहे.

अद्याप गणवेशासाठी ३० लाख ९० हजार रूपयांचा निधी आवश्यक आहे. त्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबईकडे शिक्षण विभागातर्फे पत्र पाठवून निधीची मागणी करण्यात आली आहे. जोपर्यंत निधी प्राप्त होत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांना नवीन गणवेशासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.निधीसाठी शिक्षण परिषदेकडे मागणीपहिली ते आठवीतील मुलींची संख्या ४१ हजार १४५ असून, मुलांमध्ये एस. सी. ३,२५४, एस. टी. १०१२, दारिद्र्यरेषेखालील १० हजार ४६६ मिळून एकूण १४ हजार ७३२ मुलगे आहेत. दोन गणवेशांसाठी ३ कोटी ३५ लाख २६ हजार रूपये निधीची गरज होती. मात्र, एका गणवेशासाठी निधी प्राप्त झाला असला तरी तो अपुरा आहे.शाळा व्यवस्थापन समितीमार्फत वितरणजिल्हा परिषद शिक्षण विभागातर्र्फे प्रत्येक शाळेच्या खात्यावर विद्यार्थी संख्येनुसार गणवेशाची रक्कम वर्ग करण्यात येते. शाळा व्यवस्थापन समितीतर्र्फे गणवेश खरेदी करून विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात येतात. शिक्षण विभागाकडेच अपुरा निधी प्राप्त झाला असल्याने गणवेश वितरण प्रक्रिया रेंगाळणार आहे.

एकूण लाभार्थी विद्यार्थी व त्यांना एका गणवेशासाठी आवश्यक असणाऱ्या निधीपेक्षा प्राप्त निधी अपुरा आहे. त्यामुळे आवश्यक निधीची मागणी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबईकडे करण्यात आली आहे. निधी प्राप्त होताच तो जिल्ह्यातील शाळांना वर्ग केला जाणार आहे. त्यानंतरच वितरण होणार आहे.- निशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकSchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्रRatnagiriरत्नागिरी