शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळी भांडणं मिटवतो, पण आधी शपथ घ्या की...; 'मनसे' युतीसाठी उद्धव ठाकरेंनी बंधूंसमोर ठेवली एक अट!
2
ठाकरे बंधू एकत्र येणार?; आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं सांगत राज ठाकरेंकडून युतीसाठी टाळी!
3
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...
4
संजय बांगरचा मुलगा का बनली मुलगी? 'ट्रान्सजेंडर' Anaya Bangar ने सगळंच सांगून टाकलं...
5
FD vs SIP: कोणता पर्याय ठरू शकतो बेस्ट, फायदा-तोट्याचं गणित समजून घ्या
6
“मराठीला हिंदी नाही तर गुजरातीपासून सर्वाधिक धोका”; संजय राऊतांची मनसे, भाजपावर टीका
7
Tarot Card: सुरवंटाचे फुलपाखरू होण्याचा काळ, प्रयत्नात कुचराई नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
Maharashtra Politics : इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध? हे कसं चालतं ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सवाल
9
प्रेमाचा जांगडगुत्ता! मुलीच्या सासऱ्यासोबतच ममता झाली फरार; महिलेच्या पतीला दुःख अनावर
10
कोट्याधीश करणारा वसुमती योग: ८ राशींना शुभ, उत्पन्न वाढेल; हाती पैसा राहील, लाभच लाभ होतील!
11
५ वर्षांपूर्वी मृत्यू झालेला 'तो' रिक्षा चालवताना सापडला; पत्नीशी WhatsApp वर चॅटिंग, अखेर...
12
एका शेअरवर ₹११७ चा डिविडेंड देतेय कंपनी, रेकॉर्ड डेट आता जास्त दूर नाही; पाहा कोणता आहे शेअर?
13
Mumbai: बीएमसीने 'अभय' देऊनही मुंबईकरांनी केलं दुर्लक्ष, आता भरा दोन टक्के दंड 
14
चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ मोठी जलवाहिनी फुटली; 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद!
15
मोठी बातमी: संग्राम थोपटे यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा; लवकरच भाजपमध्ये करणार प्रवेश
16
मुंबई: स्वतःवर गोळी झाडण्यापूर्वी पत्नीला पाठवला व्हिडीओ, म्हणाला, 'जगण्याची इच्छा नाही'
17
चीनकडून येणारा निकृष्ट दर्जाचा माल रोखण्याचा डाव भारतावरच उलटला! कोणाची समस्या वाढली?
18
आता इलॉन मस्क जगात वाटताहेत शुक्राणू, महिलांशी संपर्क, मुलांची ‘फौज’ तयार करणार
19
"माझ्या नावाचं मंदिर, तिथे लोक पूजा करतात"; उर्वशी रौतेलाचा मोठा दावा, पुजाऱ्याने सगळी स्टोरी सांगितली
20
फळं खावीत की ज्यूस प्यावा... आरोग्यासाठी काय फायदेशीर? डाएटीशियनने दूर केलं कन्फ्यूजन

आंब्यापाठोपाठ काजू पिकावर फळमाशीचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंताग्रस्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 16:47 IST

रत्नागिरी : जिल्ह्याच्या अर्थार्जनात मोठा वाटा असलेल्या काजूवर फळमाशीसदृश रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. टरफलापासून गरापर्यंत या किडीचा प्रादुर्भाव होत ...

रत्नागिरी : जिल्ह्याच्या अर्थार्जनात मोठा वाटा असलेल्या काजूवर फळमाशीसदृश रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. टरफलापासून गरापर्यंत या किडीचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. कीटकनाशकाची फवारणी करूनही फारसा प्रभाव जाणवत नाही. कीड लागलेला काजू बाजारात चालत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्ह्याचे हे पांढरे सोने काळवंडले आहे.जिल्ह्यात १ लाख ११ हजार ६२५ हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली आहे. उत्पादनक्षम क्षेत्र ९४ हजार ६८० हेक्टर आहे. हेक्टरी उत्पादकता १.५० टन असून, दरवर्षी १ लाख ४२ हजार २० मेट्रिक टन काजूचे उत्पादन होते. आंबा लागवडीप्रमाणे काजू लागवडीसाठी बागायतदारांना विशेष परिश्रम घ्यावे लागत नसल्याने काजू लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. योग्य खत व्यवस्थापन असल्यास चांगले उत्पादन मिळते.मात्र, सध्या नैसर्गिक बदलाचा परिणाम काजू पिकावरही झाला आहे. टीम माॅस्क्युटोसारख्या कीडरोगाचा प्रादुर्भाव आधी होता. परंतु, आता फळमाशीसदृश किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादकता धोक्यात आली आहे.

१८० रुपयेयावर्षी काजूबीला सर्वोच्च दर मिळाला. हंगामाच्या सुरुवातीला १८० रुपये किलो दराने बी खरेदी केली जात होती. गेल्या पाच वर्षातील हा उच्चांकी दर आहे. मात्र, जसजशी आवक वाढली तसतशी दरात घसरण सुरू झाली. सध्या १५० ते १६० रुपये काजूला दर मिळत आहे. यावर्षी काजूचे उत्पादन चांगले आहे, दरही चांगला होता. मात्र, कीडरोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात आले आहेत.

  • जिल्ह्यातील लागवड क्षेत्र- १ लाख ११ हजार ६२५ हेक्टर
  • उत्पादनक्षम क्षेत्र - ९४ हजार ६८० हेक्टर
  • हेक्टरी उत्पादकता - १.५० टन
  • वार्षिक उत्पादन - १ लाख ४२ हजार २० मेट्रिक टन

आंब्याप्रमाणे काजूवर फळमाशीसदृश रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कृषी विद्यापीठामध्ये याबाबत संशोधन होणे आवश्यक आहे. गतवर्षी हा प्रादुर्भाव कमी होता. मात्र, यावर्षी वाढला आहे. परिणाम काजूची उत्पादकता धोक्यात येऊ लागली आहे. नियंत्रणासाठी प्रभावी कीटकनाशके उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. - संदीप कांबळे, शेतकरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFarmerशेतकरीMangoआंबाweatherहवामान अंदाज