चिपळुणात २२ रोजी मोफत नाडी परीक्षण शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:34 IST2021-09-18T04:34:08+5:302021-09-18T04:34:08+5:30
चिपळूण : वेदिक आयुक्र्युअर हेल्थ अँड रिटेल्सतर्फे २२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत शहरातील खेंड ...

चिपळुणात २२ रोजी मोफत नाडी परीक्षण शिबिर
चिपळूण : वेदिक आयुक्र्युअर हेल्थ अँड रिटेल्सतर्फे २२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत शहरातील खेंड येथील पिंपळ गणेश मंदिरानजीकच्या स्वास्थ्य क्लिनिक या दवाखान्यात विविध आजारांवर मोफत नाडी परीक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या वेळी नाडी परीक्षण तज्ज्ञ डॉ. महेंद्र साळुंखे तपासणी करणार आहेत.
या शिबिरात हृदयासंबंधी रोग, सांधेदुखी, मधुमेह, ॲसिडिटी, स्पॉन्डीलायसीस, मूतखडा, लठ्ठपणा, रक्तदाब, ॲनिमिया, शारीरिक दुर्बलता, अस्थमा, थायरॉईड, फंगल इन्फेक्शन, मुलांची शारीरिक व मानसिक वाढ, त्वचारोग, केसगळती आणि स्त्रीरोग यावर आयुर्वेदिक उपचार करण्यात येणार आहेत. तरी इच्छुकांनी आपली नावनोंदणी करण्यासाठी डॉ. महेंद्र साळुखे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.