शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

सभापतीपदी मेस्त्रींचा मार्ग मोकळा

By admin | Updated: November 19, 2015 00:44 IST

उपसभापती पदासाठी नंदकिशोर शिर्के यांना संधी

चिपळूण : चिपळूण पंचायत समितीच्या सभापती पदासाठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे येथील सत्ता असूनही पक्षाच्या सर्वच गटातटाच्या नेत्यांनी स्नेहा मेस्त्री यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मेस्त्री यांची निवड ही केवळ औपचारिकता राहिली आहे. चिपळूण पंचायत समितीच्या सभापती समिक्षा बागवे यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाने ठरविल्यानुसार स्नेहा मेस्त्री या पदाच्या दावेदार आहेत. स्नेहा मेस्त्री या आक्रमक व अभ्यासू प्रश्न मांडणाऱ्या असून पक्षाच्या सर्वच कार्यक्रमात त्या आघाडीवर असतात. त्यामुळे राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार भास्कर जाधव, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार रमेश कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ.तानाजीराव चोरगे, विधानसभा क्षेत्राध्यक्ष दादा साळवी, तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांचा आशीर्वाद मेस्त्री यांना मिळाला आहे. माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी आपल्या समर्थक असणाऱ्या सदस्यांना स्पष्ट सूचना दिल्या असून उपसभापती पदासाठी नंदकिशोर शिर्के यांना संधी देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे मेस्त्री व शिर्के यांचा मार्ग सुकर झाला आहे. मेस्त्री यांच्या निवडीनंतर उपसभापती सुचिता सुवार आपल्या पदाचा राजीनामा देतील अशी शक्यता आहे. दि. २० रोजी सभापती पदाची निवडणूक होत आहे. यावेळी राष्ट्रवादीकडून मेस्त्री तर शिवसेनेकडून प्रिया भुवड या रिंगणात उतरणार आहेत. आतापर्यंत शिवसेनेने सभापती पदासाठी बिनविरोध संधी दिली नसल्याने यावेळीही भुवड यांनाच रिंगणात उतरविले जाणार आहे. परंतु, राष्ट्रवादी व समर्थक सदस्य एकत्र असल्याने मेस्त्री यांचे पारडे जड आहे. उपसभापती पदासाठी नंदू शिर्के यांनी अर्ज भरल्यास शिवसेनेकडून दिलीप मोरे हे रिंगणात उतरणार आहेत. सभापती पदासाठी मेस्त्री यांचा विजय निश्चित मानून हालचाली सुरु झाल्या आहेत. मेस्त्री यांचे समर्थक आपापल्या हितचिंतकांना निरोप पाठवून त्या दिवशी उपस्थित राहण्याचे आवाहन करीत आहेत. दरम्यान राष्ट्रवादीच्या माजी आमदार रमेश कदम व आमदार भास्कर जाधव या दोन्ही गटाचा आशीर्वाद स्नेहा मेस्त्री यांना मिळाल्याने ही निवड केवळ औपचारिकता म्हणून उरली आहे. (प्रतिनिधी)