मोफत आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:23 IST2021-06-25T04:23:15+5:302021-06-25T04:23:15+5:30

रत्नागिरी : कोरोना काळात कार्यरत असणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याची विशेष खबरदारी घ्यावी, वेळोवेळी तपासणी करावी या उद्देशाने रत्नागिरीतील प्राईम डायग्नोस्टिक ...

Free health check up | मोफत आरोग्य तपासणी

मोफत आरोग्य तपासणी

रत्नागिरी : कोरोना काळात कार्यरत असणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याची विशेष खबरदारी घ्यावी, वेळोवेळी तपासणी करावी या उद्देशाने रत्नागिरीतील प्राईम डायग्नोस्टिक सेंटरतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर २८ जून ते १ जुलै या कालावधीत रत्नागिरीतील प्राईम डायग्नोस्टिक सेंटर येथे होणार आहे.

शहरातील पत्रकारांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन सेंटरतर्फे करण्यात आले आहे. या शिबिरांतर्गत सीबीसी, कॅल्शिअम, क्रिएटिन, कोलेस्ट्रोल तसेच रक्तातील साखरेच्या पातळीची तपासणी केली जाणार आहे. सेंटरतर्फे आयोजित शिबिरात पत्रकारांना तपासणी तसेच आरोग्यविषयक शंकांचे निरसन करण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Web Title: Free health check up