शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरणविरोधी उद्या लांजा शहर बंद

By admin | Updated: July 27, 2015 00:20 IST

व्यापारी आक्रमक : प्रशासनाचा करणार निषेध

लांजा : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणामुळे येथील ८० ते ८५ टक्के व्यापारी उद्ध्वस्त होणार आहेत. तरीसुद्धा शासन व प्रशासन येथील व्यापाऱ्यांच्या भावनांची कदर न करता आठवडा बाजाराच्या दिवशी मंगळवार, दि. २८ जुलै रोजी मोजणी करत असल्याने शासन व प्रशासनाचा निषेध म्हणून लांजा बंद ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.लांजा बाजारपेठेच्या मध्यभागातून मुंबई - गोवा महामार्ग जात असल्याने महामार्गालगत असणारे छोटे - मोठे व्यापारी उद्ध्वस्त होणार आहेत. तसेच शहराचे दोन भाग या महामार्गामुळे होणार असल्याने मुंबई - गोवा महामार्ग संघर्ष कृती समितीने शनिवारी वक्रतुंड मंगल कार्यालय येथे सर्व बाधित व्यापाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये, कृती समितीचे अध्यक्ष महंमद रखांगी, सचिव विजय खवळे, नगराध्यक्षा संपदा वाघदरे, जयवंत शेट्ये, भाऊ वंजारे, काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन माजलकर, समितीचे उपाध्यक्ष खलील मणेर, नगरसेवक अनिल गुरव, मंगेश खवळे, प्रकाश लांजेकर, श्रीराम जंगम, परवेज घारे, प्रेमनाथ नारकर, संजय बावधनकर, सुधाकर शेट्ये, हेमंत शेट्ये, प्रभाकर शेट्ये, सचिन भिंगार्डे, अ‍ॅड. सुमंत वाघदरे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. यावेळी शहरातील जवळजवळ २०० व्यापारी उपस्थित होते.उपस्थित व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करताना कृती समितीचे अध्यक्ष महंमद रखांगी म्हणाले की, शासन - प्रशासन जबरदस्तीने ही मोजणी करत आहे. त्याचा निषेध म्हणून आपण सर्वांनी सहभाग घेऊन लांजा शहर १०० टक्के बंद ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. लोकशाही मानणारे आपण सारे लोक आहोत. त्यामुळे सनदशीर मार्गाने आपण हा बंद पुकारायचा आहे. सध्या हा चौपदरी असला तरी भविष्यात ६ किंवा ८ पदरी होणार असल्याने येथील व्यापारी, घरमालक यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. यावेळी प्रकाश लांजेकर, सचिन माजळकर, बबन स्वामी व शेवटी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये यांनी बंदसंदर्भात माहिती दिली. मंगळवारी होणाऱ्या आंदोलनाला सकाळी ९.३० वाजता प्रसन्न हॉटेल येथून सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)