शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गणपतीपुळे समुद्रात पंढरपूरचे चाैघे बुडाले, एकाचा मृत्यू; तिघांना वाचविण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 11:33 IST

स्नानाचा माेह जिवावर

गणपतीपुळे : देवदर्शनासाठी आलेले पंढरपूर येथील चाैघे अंघाेळ करताना खाेल समुद्रात बुडाल्याची घटना रविवारी सकाळी गणपतीपुळे (ता. रत्नागिरी) येथे घडली. या दुर्घटनेत अजित धनाजी वाडेकर (२५, रा. इसबावे परिचारक नगर, पंढरपूर, जि. साेलापूर) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. मात्र, अन्य तिघांना वाचविण्यात यश आले.अजय बबन शिंदे (२३), आकाश प्रकाश पाटील (२५) आणि सार्थ दत्तात्रय माने (२४, सर्व रा. इसबावे, पंढरपूर) अशी दुर्घटनेतून वाचलेल्या तिघांची नावे आहेत. अजित वाडेकर आणि त्यांचे मित्र रविवारी सकाळी १० वाजता दुचाकींवरून पंढरपूर येथून गणपतीपुळे येथे देवदर्शन व पर्यटनासाठी आले हाेते. देवदर्शन न करता आधी समुद्रात स्नान करण्याचा निर्णय चाैघांनी घेतला. स्नान करताना खाेल पाण्यात जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यावेळी अजित वाडेकर खाेल पाण्यात अडकले.त्यांना बाहेर येता येत नसल्याचे लक्षात येताच मित्रांनी व इतर पर्यटकांनी आरडाओरड केली. ही गाेष्ट जीवरक्षक आणि गस्तीसाठी असलेले गणपतीपुळे पाेलिस दूरक्षेत्राचे सहायक पाेलिस उपनिरीक्षक संदीप साळवी व हेडकाॅन्स्टेबल कुणाल चव्हाण यांच्या निदर्शनास येताच त्यांनी जीवरक्षकांना बाेलावून समुद्राच्या पाण्यात पाठवले.

जीवरक्षक अक्षय माने, महेश देवरुखकर, अजिंक्य रामाणी, विशाल निंबरे यांच्यासह व्यावसायिक राकेश शिवलकर यांनी समुद्राच्या पाण्यात उड्या घेऊन तिघांना पाण्याबाहेर काढले. त्यानंतर पाण्यात अडकलेल्या अजित वाडेकर यांना बेशुद्धावस्थेत बाहेर काढून देवस्थानच्या रुग्णवाहिकेने मालगुंड प्राथमिक आराेग्यकेंद्रात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकारी डाॅ. मधुरा जाधव यांनी तपासून अजित वाडेकर यांचा मृत्यू झाल्याचे घाेषित केले. उर्वरित तिघांची प्रकृती सुस्थितीत असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी जयगड पाेलिस स्थानकात नाेंद करण्यात आली आहे.

वर्षभरापूर्वीच लग्नसमुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेले अजित धनावडे यांचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले हाेते. मित्रांसाेबत देवदर्शनाला ते आले असता काळाने त्यांना हिरावून घेतले.

स्नानाचा माेह जिवावरपावसाळी हंगामामुळे सध्या जलपर्यटनाला बंदी घालण्यात आली आहे. मात्र, तरीही चाैघे खाेल पाण्यात स्नानासाठी उतरले. त्यांचा हा माेह एकाच्या जिवावर बेतला.

खाेल पाण्यात जाऊ नकापावसाळी हंगामामुळे समुद्राच्या पाण्याचा प्रवाह बदलत चालला आहे. त्यामुळे पर्यटक व भाविकांनी समुद्राच्या खाेल पाण्यात अंघाेळीसाठी जाऊ नये, असे आवाहन गणपतीपुळे ग्रामपंचायत व गणपतीपुळे-जयगड पाेलिसांतर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीGanpatipule Mandirगणपतीपुळे मंदिरdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यूPandharpurपंढरपूर