शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

रत्नागिरीत व्हेल माशाच्या उलटीसह सिंधुदुर्गातील चौघे ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 14:03 IST

रत्नागिरी : शहरानजीक चंपक मैदान येथे व्हेल माशाची उलटी विकण्यासाठी आलेल्या सिंधुदुर्गातील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई ...

रत्नागिरी : शहरानजीक चंपक मैदान येथे व्हेल माशाची उलटी विकण्यासाठी आलेल्या सिंधुदुर्गातील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई ग्रामीण पोलिसांनी सोमवार, ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७:५५ वाजता करण्यात केली. या चौघांकडून मोबाइल, रोख रक्कम आणि व्हेल माशाची उलटी असा एकूण १८.०२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.अटक करण्यात आलेल्या चौघांमध्ये विकास अनंत मेस्त्री (४८, रा.देवगड सिंधुदुर्ग), समीर विठ्ठल तेली (३९, रा.मालवण, सिंधुदुर्ग), राजेश मोतीराम जगताप (३४, रा.देवगड, सिंधुदुर्ग) आणि महेश मनोहर ठुकरुल (४८, रा.देवगड, सिंधुदुर्ग) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

सोमवारी सायंकाळी शहरानजिकच्या चंपक मैदान येथे काहीजण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत करोडोंची किंमत असलेल्या व्हेलमाशाच्या उलटीची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार,ग्रामीण पोलिसांनी त्याठिकाणी सापळा रचला होता. सायंकाळी चार जण त्याठिकाणी संशयास्पदरित्या फिरताना पोलिसांना दिसले.पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने पोलिसांनी त्याची झडती घेतली. त्यावेळी त्यांच्याकडून व्हेल माशाची उलटी सापडली. या चार संशयितांकडून ४ मोबाइल आणि रोख रक्कम असा एकूण १८ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी त्यांच्याविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १७२ चे कलम ३९, ४४, ४८, ४९ (ब), ५७, ५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीsindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारी