शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
7
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
8
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
9
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
10
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
11
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
12
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
13
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
14
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
15
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
16
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
17
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
18
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
19
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
20
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क

Ratnagiri: देवरुखातील सुवर्णकाराच्या अपहरणप्रकरणी चौघांच्या मुसक्या आवळल्या, मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 13:59 IST

बदलापूर आणि पनवेल येथून या चौघांना अटक

रत्नागिरी : देवरुखातील सुवर्णकार धनंजय केतकर यांच्या अपहर आणि लूट प्रकरणात कुठलेही स्पष्ट धागेदोरे नसताना केवळ तांत्रिक दृष्ट्या तपास करत पोलिसांनी चार संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. बदलापूर आणि पनवेल येथून या चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून पावणेसात लाखांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. या संशयितांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.दीपक राजेश लोहिरे (३७, रा. बदलापूर, ठाणे), विशाल मनोहर आचार्य (४५, रा. आपटेवाडी बदलापूर, ठाणे) यांना बदलापूरहून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून रोख १ लाख ६० हजार रुपये जप्त करण्यात आले. पनवेल येथून प्रणित संजय दुधाणे (३०) आणि राजेश अनंत नवाले (३५, दोन्ही रा. भडकंबा पेटवाडी, ता. संगमेश्वर) या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून मोबाइल, कार असा ५ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.धनंजय केतकर बुधवार दि. १७ सप्टेंबर रोजी रात्री १०:३० वाजता साखरप्याहून देवरूखकडे येत होते. त्यावेळी साखरपा ते देवरूख जाणाऱ्या रस्त्यावर वांझोळे गावाजवळ एक पांढरी गाडी त्यांच्या गाडीला घासून पुढे उभी राहिली. त्यातील संशयितांनी केतकर यांना जबरदस्तीने आपल्या कारमध्ये बसवून त्यांच्या गळ्यातील ३ चेन आणि रोख २० हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर केतकर यांना एका ठिकाणी नेऊन दुसऱ्या गाडीत बसवले. त्या गाडीतील संशयितांनी ५ लाखांच्या खंडणीची मागणी केली. मात्र नंतर वाटूळ येथे पुलाखाली सोडले. गस्त घालणाऱ्या राजापूर पोलिसांना ते जखमी अवस्थेत सापडले. त्यांनीच केतकर यांना देवरूखला सोडले.पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने वेगवेगळी पथके रवाना करण्याबाबत सूचना दिल्या. अतिरिक्त पोलिस अधिक्षक बी. बी. महामुनी यांनीही घटनास्थळी भेट देउन तपासाबाबत मार्गदर्शन करत संशयितांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना होती. या दोन्ही अधिकाऱ्यांसह लांजा उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे, देवरूख पोलिस ठाण्याचे निरीक्षक उदय झावरे, तसेच उपनिरीक्षक संदीप ओगले, प्रशांत बोरकर, सहायक पोलिस फौजदार पांडुरंग गोरे, सुभाष भागणे, हवालदार नितीन डोमणे, विनायक राजवैध, विक्रम पाटील, गणेश सावंत, योगेश नार्वेकर, प्रवीण खांबे, विवेक रसाळ, योगेश शेट्ये, रमिज शेख, शांताराम झोरे, बाळू पालकर, विजय आंबेकर, सत्यजित दरेकर, दीपराज पाटील, अमित कदम, भैरवनाथ सवाईराम, विनोद कदम, पोलिस शिपाई अतुल कांबळे, महिला कॉन्स्टेबल शीतल पिंजरे, चालक पोलिस नाईक दत्ता कांबळे आणि नीलेश शेलार या तपास कामात सहभागी झाले होते.

सीसीटीव्हीची मदतया तपासात तांत्रिक अंगाने अधिक तपास करण्यात आला. अपहरण करणाऱ्यांच्या गाड्या शोधण्यासाठी पोलिसांना सीसीटीव्हीची मोठी मदत झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri: Four arrested in Devrukh kidnapping case, stolen goods seized.

Web Summary : Police arrested four suspects in the Devrukh jeweler kidnapping and robbery case. Stolen goods worth ₹7.25 lakhs, including cash, mobile and car, were recovered from them in Badlapur and Panvel. The jeweler was abducted, robbed and later released.