रिपाइं आठवले गटाचे माजी अध्यक्ष अनंत जाधव यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:29 IST2021-05-22T04:29:20+5:302021-05-22T04:29:20+5:30

जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील वरवडे गावचे सुपुत्र, रिपाइं आठवले गटाचे माजी तालुकाध्यक्ष अनंत गोविंद जाधव (६२) यांचे गुरूवारी (दि. ...

Former president of Ripai Athavale group Anant Jadhav passes away | रिपाइं आठवले गटाचे माजी अध्यक्ष अनंत जाधव यांचे निधन

रिपाइं आठवले गटाचे माजी अध्यक्ष अनंत जाधव यांचे निधन

जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील वरवडे गावचे सुपुत्र, रिपाइं आठवले गटाचे माजी तालुकाध्यक्ष अनंत गोविंद जाधव (६२) यांचे गुरूवारी (दि. २०) अल्पशा आजाराने निधन झाले.

अनंत जाधव हे धडाडीचे, कणखर, निष्ठावान, झुंजार व सेवाभावी प्रभावी कार्यकर्ते म्हणून रत्नागिरी तालुक्यात प्रसिध्द होते. अनेकांना मदतीचा हात देणारे ते कुशल संघटक होते. वरवडे शिक्षण संस्थेचे ते सदस्य म्हणून अनेक वर्ष कार्यरत होते. बावीस खेडी बौद्धजन संघटना वाटद - खंडाळा या संघटनेचे अध्यक्ष, वरवडे बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष, सल्लागार म्हणून त्यांनी काम केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्थापित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांच्या नेतृत्त्वाखाली रिपाइं रत्नागिरी तालुक्याचे अध्यक्षपद भूषवले. जाधव यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुली, सून, भाऊ असा परिवार आहे.

Web Title: Former president of Ripai Athavale group Anant Jadhav passes away