शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी हाती घेतली मशाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 21:42 IST

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हाती बांधले शिवबंधन

हर्षल शिरोडकर, लोकमत न्यूज नेटवर्क, खेड: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज रविवारी शेकडो समर्थकांसह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शहरातील महाड नाका येथील एसटी मैदानावर उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या जाहीर सभेत अखेर संजय कदम यांनी मशाल हाती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत विश्वास काका कदम,  विजय मोहिते,  माजी जिल्हा परिषद सदस्य नफिसा परकार, राजेंद्र आंब्रे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हाती शिवबंधन बांधले.

निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव शिंदे गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांची पहिलीच जाहीर सभा आज पार पडली. पक्ष प्रवेशानंतर माजी आमदार कदम यांनी रामदास कदम यांच्यावर सडकून टीका केली. आगामी काळात होणार्‍या जिल्हा परिषद. पंचायत समिती  उध्दव ठाकरे शिवसेनेचे सभापती बसवु असा निर्धार व्यक्त केला. रामदास कदम यांची ताकद शिल्लक राहिली नाही त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जो कोण उमेदवार द्याल त्याला निवडून देऊ असे आश्वासन दिले.

या सभेला शिवसेना नेते अनंत गीते,आमदार भास्कर जाधव, सचिव खासदार विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर, खासदार अरविंद सावंत, उपनेते आमदार राजन साळवी, माजी पालकमंत्री रवींद्र वायकर, ॲड. अनिल परब, जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख सचिन कदम, विलास चाळके उपस्थित होते.

टॅग्स :KhedखेडUddhav Thackerayउद्धव ठाकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेस