शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणातील गावाकडे निघाले, ओव्हरटेक करताना दुचाकी घसरली; एकाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 12:00 IST

सौरभ हा अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचा व हरहुन्नरी एकुलता एक मुलगा होता

देवरुख : गणेशाेत्सवासाठी मुंबई - अंधेरी येथून दुचाकीने आपल्या घरी यायला निघालेल्या साडवली - भुवडवाडी (ता. संगमेश्वर) येथील तरुणाचा दुचाकी अपघातातमृत्यू झाला. हा अपघात ओव्हरटेक करताना रविवारी (१७ सप्टेंबर) सकाळी ८:३० च्या सुमारास मुंबई - गोवा महामार्गावरील खेरशेत (ता. चिपळूण) येथे झाला. सौरभ सुरेश शिगवण (२३) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.सौरभ हा गेली दोन वर्ष मुंबई येथे कामाला होता. गणेशोत्सवासाठी तो आपल्या साडवली येथील घरी येण्यासाठी दुचाकीने निघाला होता. त्याच्यासाेबत त्याचा मित्र देवेंद्र रावणंग (२१, रा. देवरुख) हा हाेता. मुंबई - गोवा महामार्गाने प्रवास करत असतानाच संगमेश्वर तालुक्याची हद्द येण्यापूर्वीच खेरशेत येथे ओव्हरटेक करताना दुचाकी घसरून अपघात झाला. यामध्ये सौरभ शिगवण याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्या साेबत असलेला मित्र देवेंद्र जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सौरभ हा अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचा व हरहुन्नरी एकुलता एक मुलगा होता. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने तो कामानिमित्त मुंबई येथे गेला होता. ताे आपल्या कुटुंबीयांचा आधार बनला होता. गणेशोत्सवाच्या तोंडावरच झालेल्या या अपघातामुळे शिगवण कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. या घटनेनंतर भुवडवाडीवर शोककळा पसरली आहे.सौरभच्या पश्चात आई, वडील व एक विवाहित बहीण असा परिवार आहे. रविवारी सायंकाळी उशिरा त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातDeathमृत्यू