शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: राजापुरात पूरस्थिती; अर्जुना, कोदवली नद्यांनी ओलांडली इशारा पातळी, पहिल्याच दिवशीच शाळांना सुट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 12:21 IST

पुराचे पाणी जवाहर चौकापर्यंत, संततधारेने जनजीवन विस्कळीत

विनोद पवार राजापूर : गेले चार दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे अर्जुना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. अर्जुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोदवली व अर्जुना नदीच्या पाण्याने जवाहर चौकात धडक दिली. आज, सोमवारी सकाळी अचानक राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेडा पडल्याने व्यापारी व नागरिकांची एकच तारांबळ उडाली. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गत आठवड्यापासून पावसाने राजापूर तालुक्याला चांगलेच झोडपले. शहरासह ग्रामीण भागातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून वाहतूक बंद झाली आहे. शहरातून शीळ गोठणे भागाकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला असुन वाहतुक ठप्प झाली आहे. चिंचबाध, गुजराळी, आंबेवाडी, धोपेश्वर या भागाकडे जाणारे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अनेकांच्या दुकानात पुराचे पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांनी माल सुरक्षित स्थळी हलवला आहे. तर सकाळपासुन एस टी वाहतुकही बंद करण्यात आली आहे. रविवारी रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे कोदवली व अर्जुना नद्यांच्या पाण्याने धोका पातळी ओलांडल्याने राजापूरचे तहसिलदार विकास गंबरे, नगर परिषदेचे मुख्य लिपिक जितेंद्र जाधव यांनी पुरस्थितीची पाहणी करुन नागरिकाना सावधानतेचा इशारा दिला आहे. पहिल्याच दिवशी शाळांना सुट्टीशहरात सकाळीच पुराचे पाणी शिरल्याने शहरातील शाळा प्रवेशोत्सव साजरा करुन सोडुन देण्यात आल्या आहेत.