शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात पाच वाहनांचा अपघात, २० जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 16:30 IST

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात मंगळवारी दुपारी २:३० वाजता पुन्हा एकदा भीषण अपघात घडला. एकाच ठिकाणी पाच वाहने ...

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात मंगळवारी दुपारी २:३० वाजता पुन्हा एकदा भीषण अपघात घडला. एकाच ठिकाणी पाच वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात घरडा कंपनीच्या बसचा समावेश असून, या बसमधील २० कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. घाटात दोन तास वाहतूक बंद झाली होती. हा अपघात भीषण असला तरी सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. या ठिकाणी आतापर्यंत चारवेळा अपघात झाला आहे.परशुराम घाटात ज्या ठिकाणी संरक्षक भिंत कोसळली आहे, त्या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे. मंगळवारी दुपारी २:३० वाजता चिपळुणातून लोटे औद्योगिक वसाहतीकडे निघालेल्या घरडा कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या बसला मुंबईहून आलेल्या कंटेनरची समोरासमोर धडक बसली. यामध्ये बसला जोरदार दणका बसला. याचवेळी कंटेनर बाजूला असलेल्या आयशर टेम्पोवर उलटला.घरडा कंपनीच्या बसच्या मागे एक कार आणि त्या मागे एक ट्रक होता. बसच्या मागे असणाऱ्या गाड्या एकमेकांवर आदळल्याने घरडा कंपनीच्या बसमधील वीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. खासगी बस आणि कंटेनर यांच्यातील अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूने पूर्णतः ठप्प झाली होती. चिपळूण पोलिसांच्या प्रयत्नातून सुमारे दोन ते अडीच तासाने या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली. उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी पाहणी करून महामार्ग मोकळा करून घेण्यासाठी मदत केली.खबरदारीअभावी अपघातया घाटात या ठिकाणी अपघात होण्याची ही चौथी घटना आहे. या ठिकाणी अपघाताच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यावर ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर याच ठिकाणी मोठा अपघात घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्गAccidentअपघात