शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
2
“वाह फडणवीस वाह, एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार”
3
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
4
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
5
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
6
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
7
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
8
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
9
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
10
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
11
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
12
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
13
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
14
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
15
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
16
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
17
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
18
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
19
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
20
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण

जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 06:40 IST

देवरुखचे  काशीराम चाळके यांच्या अंत्यविधीसाठी त्यांची मिरारोडची कन्या मिताली, जावई विवेक आणि नातू निहार हे रविवारी रात्री कारने निघाले होते. 

खेड (जि. रत्नागिरी) : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे नाका येथे जगबुडी नदीच्या पुलावरून सुमारे १०० फूट खोल कार कोसळून दोन कुटुंबांतील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, अन्य दोघे गंभीर जखमी आहेत. दोन्ही कुटुंबे मुंबईहून देवरूखला अंत्यविधीसाठी जात असताना सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला.

मेधा परमेश पराडकर (५०), सौरभ परमेश पराडकर (२२), मिताली विवेक मोरे (४५), निहार विवेक मोरे (१९), श्रेयस राजेंद्र सावंत (२३) अशी मृतांची नावे आहेत. कार चालवणाऱ्या परमेश पराडकर (५२) आणि विवेक श्रीराम मोरे (४९) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

देवरुखचे  काशीराम चाळके यांच्या अंत्यविधीसाठी त्यांची मिरारोडची कन्या मिताली, जावई विवेक आणि नातू निहार हे रविवारी रात्री कारने निघाले होते. 

चालकाला डुलकी?दुहेरी मार्ग असल्यामुळे जगबुडी नदीवर येणारा व जाणारा असे दोन पूल आहेत. या पुलांच्यामध्ये असलेल्या छोट्या जागेतून कार नदीच्या पात्रात कोसळली. येथील कठडा यापूर्वीच तुटलेला आहे. चालकाला डुलकी आल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

स्थानिक धावले मदतीलामारे यांचे नालासोपाऱ्यातील नातलग परमेश पराडकर, पत्नी मेघा, मुलगा सौरव आणि श्रेयस सावंत हेही त्यांच्या सोबत होते. परमेश कार चालवत होते. पहाटे खेड-भरणे येथे पुलाचा कठडा तोडून त्यांची कार नदीच्या कोरड्या पात्रात कोसळली.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरू केले. कार पात्रातून काढून जखमींना हाॅस्पीटलमध्ये दाखल केले. मात्र, पाच जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातात विवेक मोरे आणि परमेश पराडकर जखमी झाले. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू