फिटनेस फंडा : आपले काम, आपली स्थिती... (भाग २)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:30 IST2021-08-29T04:30:31+5:302021-08-29T04:30:31+5:30

सकाळीच तो आला. मान अवघडलेली. उजवा हात दुखतोय. थोडासा हात बधीरसारखा. खांद्यावर आणि खांदा ते मान यातला भाग सुजलेला. ...

Fitness Fund: Your Work, Your Status ... (Part 2) | फिटनेस फंडा : आपले काम, आपली स्थिती... (भाग २)

फिटनेस फंडा : आपले काम, आपली स्थिती... (भाग २)

सकाळीच तो आला. मान अवघडलेली. उजवा हात दुखतोय. थोडासा हात बधीरसारखा. खांद्यावर आणि खांदा ते मान यातला भाग सुजलेला. उजवीकडे मान हलवता येत नव्हती. कोपरात सूज होती. दुखत होता. मी सर्वप्रथम त्याच्या या आजाराचा मागोवा घेतला. लक्षणे तपासली. त्याला सांगितलं, ‘तुझ्याकडून आता काही व्यायाम करून घेतो. फिजिओथेरपीमधले व्यायाम. सोबत संबंधित स्नायू गटांना विद्युत उत्तेजन (ELECTRICAL STIMULATION) आणि सूक्ष्म विद्युत चुंबकीय लहरींचा शेक (SHORT WAVE DITHERMY) देतो. नंतर तुला काय करायचं सांगतो. पहिल्यांदा एक लक्षात घे, हा काही आजार नाही. स्पॉन्डिलायसिस, मणक्यांची झीज, टेनिस एल्बो आदी काहीही नाही...!’

त्याला मी वरीलप्रमाणे भौतिक उपचार दिले. लगेच तो म्हणाला, ‘सर! अहो आता मला एकदम चांगलं वाटतंय. मान हलवून दाखवली. आखडलेपण, अवघडलेपण याचा कुठेही अवशेष शिल्लक नव्हता. तो खूश झाला. इतक्या दिवसात मी अशी ताणरहित, वेदनारहित स्थिती आजच अनुभवतो. मी त्याला त्याच्या मागची कारणमीमांसा सांगितली. व्यायाम, काम करण्याची पद्धत आदी डिटेल सर्व सांगितलं आणि दर ५-६ दिवसांनी फोन करत जा, हेही सांगितलं. पुन्हा यायची गरज नाही हे ठासून सांगितलं. आता दर चार-पाच दिवसांनी फोन येतो. ‘म्हणतो, डॉक्टर, काहीही त्रास नाही. कामाची क्षमता वाढली आहे, झोप चांगली लागते...!’

कामाची आपली स्थिती, पद्धत, बसणं, उठणं, आपलं वजन, कामात थोडा वेळ घेणं, तो महत्त्वाच्या मीटिंग्स किंवा डिलिंंग्ज असताना कदाचित वेळ मिळत नाही. त्यावेळेस आपल्या त्याच स्थितीत पोझिशन्स ऑल्टर करणे किंवा बदलणे आदी बाब आवश्यक असतात, हेच आपण विसरतो. असे कित्येक युवा आणि सर्वांगीण वयातला लोकांची हीच तक्रार आहे. म्हणून आपण काही टीप्स वर्क फ्रॉम होम, कार्यालयामध्ये शिकविताना शिक्षक, पोलीसकर्मी यांनी कामावर, स्वयंपाक करताना आपल्या भगिनी, अभ्यास करताना विद्यार्थी, शेतकरी, सुतारकाम यासारखे काम करणारे, पेंटर्स, वेल्डर्स, डॉक्टर्स, सर्जन्स, सर्व प्रकारचे वाहनचालक, प्रवासी जॉब असणारे आदी यांनी या सर्व गोष्टी आवर्जून कराव्यात. विशेषत: ज्यांना मान वाकवून म्हणजेच मान मोडून काम करावे लागते, त्यांनी माझ्या टिप्सवर भर द्यावा.

याचा एक फायदा वयाप्रमाणे होणारी मणक्यांची झीज लवकर होणार नाही. उलट त्याला पक्के धरून ठेवणारे स्नायू, स्नायू बंध, शिरा, रक्ताभिसरण आणि मोकळ्या, वेदनारहित हालचाली, शाश्वत राहतील किंवा वयाप्रमाणे होणारी झीज पुढे पुढे ढकलल्या जाईल. अर्थात या सर्व वैद्यकशास्त्रीय गोष्टी मांडताना एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवावी, ती म्हणजे पोषक आहार, विश्रांती पुरेपूर, झोप आणि योग्य मनोरंजन आदी आपल्या मनाची, शरीराची, काम करण्याच्या क्षमतेची आणि विचार शक्तीची एक सुंदर बाग आहे. हे जपायलाच हवी, तर या टिप्सचा उपयोग शंभर टक्के.

आता त्या अनुषंगाने महत्त्वाच्या टिप्सकडे वळूया. मात्र, अजूनही कोविड-१९ आहे. तो आपल्याला संपवायचा आहे, त्याच्या महत्त्वाच्या टिप्स जपूयाच आणि सर्वजण सुरक्षित राहूया...!

(क्रमश:) - डॉ. दिलीप पाखरे

Web Title: Fitness Fund: Your Work, Your Status ... (Part 2)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.