शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

मासेमारीवरील निर्बंध : सागरी मत्स्य उत्पादनाच्या मूळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 13:08 IST

कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्रातील मत्स्योत्पादन अन्य राज्यांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घटले आहे. सागरातील पर्ससीन मासेमारीबाबत राज्यात असलेले अनेक निर्बंध हेच मत्स्योत्पादनाच्या मुळावर उठले असून, राज्याच्या सागरी हद्दीत घुसखोरी करणाऱ्या कर्नाटक व गुजरात या राज्यांच्या मत्स्योत्पादनात अनेक पटींनी वाढ झाली आहे. राज्याचे हे मत्स्योत्पादनातील नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शासनाने वेळीच उपाययोजना करावी, यासाठी आता कोकण सागरी किनाऱ्यावरील पर्ससीन मच्छीमार पुढे सरसावले आहेत.

ठळक मुद्देमासेमारीवरील निर्बंध : सागरी मत्स्य उत्पादनाच्या मूळावरमत्स्योत्पादनात महाराष्ट्र  मागे; कर्नाटक, गुजरात पुढे

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्रातील मत्स्योत्पादन अन्य राज्यांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घटले आहे. सागरातील पर्ससीन मासेमारीबाबत राज्यात असलेले अनेक निर्बंध हेच मत्स्योत्पादनाच्या मुळावर उठले असून, राज्याच्या सागरी हद्दीत घुसखोरी करणाऱ्या कर्नाटक व गुजरात या राज्यांच्या मत्स्योत्पादनात अनेक पटींनी वाढ झाली आहे. राज्याचे हे मत्स्योत्पादनातील नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शासनाने वेळीच उपाययोजना करावी, यासाठी आता कोकण सागरी किनाऱ्यावरील पर्ससीन मच्छीमार पुढे सरसावले आहेत.कोकणातील रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील पर्ससीन व अत्याधुनिक मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांची बैठक अलिबागमध्ये झाली. त्यावेळी पर्ससीन मच्छिमारांच्या नॅशनल पर्ससीन असोसिएशनने याचे नेतृत्व केले आहे. या बैठकीत तब्बल २०० मच्छीमार प्रतिनिधींनी सहभाग घेतला. त्यातून पर्ससीन मच्छीमारांची राज्य सरकारच्या निर्बंधाविरोधातील लढ्याची तयारी दिसून आली. यापुढे पर्ससीन मासेमारीवरील निर्बंधांना कडवा विरोध केला जाणार आहे.राज्यात पर्ससीन मासेमारीला १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या चार महिन्यांच्या काळातच मासेमारीसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतरच मत्स्योत्पादनात राज्य पिछाडीवर गेले आहे. अशीच स्थिती राहिल्यास महाराष्ट्र राज्य मत्स्योत्पादनात आणखी मागे जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.राज्याला ७२० किलोमीटरची अरबी समुद्राची किनारपट्टी लाभली आहे. या किनाऱ्यावर मासेमारी हाच मुख्य व्यवसाय चालतो. मात्र, पारंपरिक मच्छीमार व पर्ससीन मच्छीमार या वादात राज्य सरकारने सोमवंशी समितीच्या शिफारशी स्वीकारत पर्ससीन मासेमारीवर अन्याय केल्याचा ठपका पर्ससीन मच्छीमारांनी राज्य सरकारवर ठेवला आहे.राज्यात २ हजारावर पर्ससीन नौका असून, त्यावर दहा लाख लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होत आहे. मात्र, सरकारच्या धोरणाचा फटका पर्ससीन मासेमारीला बसला आहे. त्यामुळे राज्याच्या मत्स्योत्पादन क्षमतेलाही धक्का बसला असून, परकीय चलनातही नुकसान झाले आहे.समुद्रातील मत्स्यसाठ्यांबाबत शासनाच्या संबंधित विभागांकडून कोणतेही शास्त्रीय संशोधन केले जात नाही. मात्र, आधुनिक मच्छीमारीबाबत विरोधातील चुकीची धोरणे राबवली जात आहेत. त्यामुळे देशात मासेमारीबाबतचे सर्व राज्यातील धोरण एकच असावे, अशी मागणी केली जात आहे.

२०१६च्या फेबु्रवारी महिन्यापासून महाराष्ट्र सरकारने सोमवंशी समितीच्या शिफारशीनुसार पर्ससीन मासेमारीवर निर्बंध आणले. आजही हे निर्बंध कायम असून, त्यामुळे राज्य मत्स्य उत्पादनात पिछाडीवर गेल्याचा ठपका ठेवला जात आहे.पर्ससीन : वेळीच उपाययोजनांची मागणीगेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राचे मत्स्योत्पादन कमी झाले आहे. २०१२ साली महाराष्ट्राचे मत्स्योत्पादन ४.५० लाख टन होते. हेच उत्पादन २०१८मध्ये २.८० लाख टनापर्यंत खाली आले आहे. मात्र, २०१२मध्ये कर्नाटकचे मत्स्योत्पादन २.५० लाख टन होते. २०१८ मध्ये ते ५.५० लाख टन झाले, तर गुजरातचे मत्स्योत्पादन २०१२ मध्ये ५.५० टन होते ते २०१८ मध्ये ७.९० लाख टनावर पोहोचले.

टॅग्स :fishermanमच्छीमारRatnagiriरत्नागिरी