जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढीची प्रथमच ऑनलाईन सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:33 IST2021-03-23T04:33:55+5:302021-03-23T04:33:55+5:30
वाटूळ : रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढीची ३४ वी वार्षिक सभा काेराेनामुळे प्रथमच ऑनलाईन घेण्यात आली. या ...

जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढीची प्रथमच ऑनलाईन सभा
वाटूळ : रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढीची ३४ वी वार्षिक सभा काेराेनामुळे प्रथमच ऑनलाईन घेण्यात आली. या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
जिल्हा उपनिबंधक रत्नागिरी यांच्या आदेशानुसार पतपेढीचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संचालकांच्या उपस्थितीत ऑनलाईन सभा ४ तास चालली. पतपेढी सचिव प्रमोद पटवर्धन यांनी इतिवृत्त वाचन केले.
सभासदांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन कर्जमर्यादा २१ लाखावरून २९ लाख करणे, सभासद साहाय्यता निधी ३५ हजारावरून वाढवून २५ लाखाच्या कर्जाला संरक्षण देण्यासाठी ७० हजार करणे, तसेच नगरपरिषदेने धोकादायक इमारत म्हणून नोटीस दिल्याने पतपेढीचे मुख्य कार्यालय इमारत दुरुस्तीस मान्यता, असे विषय आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले.
कोट
कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे दरवर्षी ऑगस्ट महिन्यात संपन्न होणाऱ्या वार्षिक सभेस यावेळी खूप विलंब झाला. राज्यपाल यांच्या निर्देशानुसार ऑनलाईन पद्धतीने प्रथमच सभा घेण्यात आली. वेळेअभावी अनेकांना आपली विस्तृत मते मांडता आली नाहीत. काही सभासदांनी दिलेल्या बहुमूल्य सूचनांचा आदर निश्चित राखला जाईल.
- उत्तम ग. कांबळे,
अध्यक्ष, जिल्हा माध्यमिक सेवक सहकारी पतपेढी, रत्नागिरी.