शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

लोटेतील प्रिवी कंपनीचे गोडावून आगीत भस्मसात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 05:53 IST

रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. कंपनीच्या कामात लागणारे विविध प्रकारच्या सॉल्वंटची या गोडावूनमध्ये साठवणूक करण्यात आली आहे.

सुनील आंब्रे -आवाशी (खेड) : मुंबई-गोवा महामार्गावरील लोटे औद्योगिक वसाहतीमधील प्रिवी ऑर्गेनिक कंपनीचे गोडावून रविवारी पहाटे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. कंपनीला लागणारा कच्चा माल या गोडावूनमध्ये ठेवण्यात आला आहे. या कंपनीचा मुख्य प्लांट आणि अशोका गॅसचा प्लांट जवळच असल्याने अजूनही भीती कायम आहे.

रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. कंपनीच्या कामात लागणारे विविध प्रकारच्या सॉल्वंटची या गोडावूनमध्ये साठवणूक करण्यात आली आहे. सॉल्वंट अत्यंत ज्वालाग्रही असल्याने, ही आग झपाट्याने वाढली. एमआयडीसीच्या दोन अग्निशमन बंबांसह चिपळूण व खेड नगरपालिकेचे अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र आगीने रौद्र रुप धारण केले असल्याने ती अजून आटोक्यात आलेली नाही.

आग लागली तेव्हा गोडावूनमध्ये कोणीही नव्हते. यामुळे कोणाला दुखापत झालेली नाही. मात्र मंगेश पवार नामक एका कामगाराला आगीतून पसरलेल्या वायूची बाधा झाली आहे.

या कंपनीचा मुख्य प्रकल्प आणि अशोका गॅस कंपनी, या गोडावून नजीक आहेत. जर आग आटोक्यात आली नाही तर अनर्थ ओढवण्याची भीती आहे. आत्ता आग आटोक्यात आणण्यायाठी कंपनीचे कामगार, ग्रामस्थ, अग्निशमन यंत्रणांचे कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfireआगFire Brigadeअग्निशमन दल