मालदोलीमध्ये आगीत गोठा जळून खाक, २ जनावरे मृत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:30 IST2021-03-20T04:30:25+5:302021-03-20T04:30:25+5:30
अडरे : तालुक्यातील मालदोली येथे गोठ्याला आग लागून संपूर्ण गोठा जाळून खाक झाला. जिवाच्या आकांताने गुरे सैरावैरा पळाली. मात्र ...

मालदोलीमध्ये आगीत गोठा जळून खाक, २ जनावरे मृत
अडरे : तालुक्यातील मालदोली येथे गोठ्याला आग लागून संपूर्ण गोठा जाळून खाक झाला. जिवाच्या आकांताने गुरे सैरावैरा पळाली. मात्र दुर्दैवाने एक वासरू आणि १ म्हैस जळून मृत झाले. अन्य जनावरे आगीमुळे भाजून जखमी झाली आहेत. या आगीत सुमारे २ लाख ६० हजारांचे नुकसान झाल्याची माहिती शेतकरी अजीज म. इसाक तांबे यांनी दिली.
चिपळूणच्या खाडीभागातील मालदोली येथील शेतकरी अजीज म. इसाक तांबे यांचे संपूर्ण कुटुंब शेतीवर अवलंबून आहे. त्यासाठी त्यांनी गुरे सांभाळली होती. गोठ्यात एकूण १५ गुरे होती. गुरुवारी दुपारी अचानक गोठ्याला आग लागली. आग कशी लागली हे कोणालाच समजले नाही. अजीज तांबे त्यावेळी घरात नव्हते. गावातील लोकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता.
आगीच्या झळा बसताच गुरे दावे तोडून सैरावैरा पळू लागली. मात्र आगीने गोठ्याला चारही बाजूंनी वेढले होते. १५पैकी १३ गुरे बाहेर पडू शकली. मात्र एक वासरू आणि एक म्हैस मात्र मृत झाले. गोठा पूर्णपणे खाक झाला आहे. तलाठी उमेश राजेशिर्के यांनी पंचनामा केला.
...................
फोटो आहे.