शहरं
Join us  
Trending Stories
1
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
2
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
3
SIR वरुन पश्चिम बंगालमध्ये तणाव वाढला; कोलकात्यात शेकडो BLO चे तीव्र आंदोलन...
4
“CM असताना अडीच तासांपेक्षा जास्त कधी झोपलो नाही, विरोधकांची झोप उडवली”: एकनाथ शिंदे
5
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
6
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
7
IND vs SA: रोहित शर्मासोबत एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? विराट कोहलीही टक लावून बघतच बसला...
8
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
9
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
10
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
11
Video: Kiss घेण्याचा मोह...; प्रेमी जोडप्याचे मालगाडी खाली बसून 'नको ते' चाळे अन् अचानक... 
12
हृदयद्रावक! शेतीसाठी घेतलं १५ लाखांचं कर्ज पण पुराने पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
13
Travel : मुंबईजवळची 'ही' ठिकाणं पाहिल्यावर गोवाही विसराल! न्यू इअर सेलिब्रेशनसाठी बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन्स
14
मामला 'गंभीर' है...! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
15
इम्रान खानवर पाकिस्तान सरकारची मोठी कारवाई! न्यूज चॅनेल्सना दिले आदेश, नेमकं काय घडतंय?
16
बाजार विक्रमी पातळीवरून घसरला! सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगाग बंद; ऑटो शेअर्सची मात्र कमाल!
17
“मतदानाला ४८ तास असताना निवडणुका स्थगित करणे अनाकलनीय, निवडणूक आयोग...”; काँग्रेसची टीका
18
VPN वापरताय? थांबा! आताच सावध व्हा; गुगलने दिलीय 'रेड अलर्ट' वॉर्निंग, बँक खातं होऊ शकतं रिकामी
19
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
20
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत जीवन प्राधिकरणाच्या गोदामाला आग, आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात धुराचे लोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 17:23 IST

गोदामामध्ये ठेवण्यात आलेले एचडीपी पाइप जळून खाक

रत्नागिरी : शहरातील नाचणे येथील हवामान केंद्रासमोर असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या गोदामाला रविवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत गोदामामध्ये ठेवण्यात आलेले एचडीपी पाइप जळून खाक झाले असून, ९ लाख ५० हजारांचे नुकसान झाले आहे. या आगीची रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.रविवारची सुट्टी असल्याने नागरिक घरात होते, गारठा असल्याने शहरातील रस्त्यावरही वर्दळ कमी होती. सकाळी नाचणे परिसरातील हवामान केंद्रासमोरील मोकळ्या जागेत असलेल्या जीवन प्राधिकरणाच्या गोदाम परिसरात धुराचे लोट दिसताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गोदामाच्या बाहेरील बाजूस असलेल्या वाळलेल्या गवताला सुरुवातीला आग लागली होती. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने ही आग वेगाने पसरत गोदामाच्या आतपर्यंत पोहोचली.या गोदामात पाणीपुरवठा योजनांसाठी वापरण्यात येणारे मोठे एचडीपी पाइप साठवून ठेवण्यात आले होते. हे पाइप ज्वलनशील असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले, त्यामुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. आगीमध्ये पाइप जळल्यामुळे ९ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी नगर परिषदेचा अग्निशमन बंब तसेच एमआयडीसीचा अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तासाभरात आग आटाेक्यात आणण्यात त्यांना यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Fire Engulfs Maharashtra Jeevan Pradhikaran Warehouse in Ratnagiri; Loss Estimated

Web Summary : A major fire broke out at Maharashtra Jeevan Pradhikaran's warehouse in Ratnagiri destroying stored HDPE pipes. The fire, suspected to have started from dry grass, caused an estimated loss of ₹9.5 lakhs. Firefighters quickly controlled the blaze, preventing casualties.