शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: खेर्डीतील थ्री एम पेपर मिल कंपनीत आग, आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 15:34 IST

नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे धोका टळला

चिपळूण : तालुक्यातील खेर्डी एमआयडीसी परिसरातील थ्री एम पेपर मिल कंपनीला सोमवारी दुपारी २ वाजता अचानक भीषण आग लागून परिसरात एकच गोंधळ उडाला. दुपारी अचानक उठलेल्या धुराच्या लोटानंतर अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. कंपनीत मोठ्या प्रमाणात कागदाचा साठा असल्याने ज्वाळांनी क्षणार्धातच वेग घेतला आणि आगीचे प्रमाण झपाट्याने वाढले. मात्र, नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे धोका टळला.आग लागल्याची माहिती मिळताच कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना तत्काळ सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले. परिसरात प्रचंड धूर पसरल्याने स्थानिकांमध्येही चिंता व्यक्त करण्यात आली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चिपळूण नगर परिषदेच्या अग्निशमन दलाची गाडी तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. अर्ध्या तासांहून अधिक वेळ ज्वाळा भडकलेल्या स्थितीत आहेत.आग आटोक्यात आणण्यासाठी पाणी फवारणी आणि इतर उपकरणांच्या सहाय्याने प्रयत्न सुरू आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून प्राथमिक अंदाजानुसार, विद्युत बिघाड किंवा मशिनरी ओव्हरहिट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Fire at Ratnagiri Paper Mill, Cause Unknown; No Casualties

Web Summary : A major fire broke out at Three M paper mill in Ratnagiri's Kherdi MIDC on Monday. All workers were safely evacuated. Firefighters are working to control the blaze. The cause is still unclear, but electrical faults are suspected.