शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

आंघाेळ करताना तरुणींचे चित्रीकरण, अल्पवयीन युवकावर गुन्हा दाखल; राजापुरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 16:44 IST

पीडित तरुणी अंघोळीसाठी गेली असता बाथरूमची भिंत आणि छप्पर यांच्यामध्ये असलेल्या मोकळ्या जागेत मोबाईल व कॅमेरा दिसला.

राजापूर : मुंबईहून आपल्या मामाच्या गावी आलेल्या तरुणींचे अंघोळ करताना मोबाईलच्या कॅमेऱ्याने चित्रीकरण केल्याचा लाजिरवाणा प्रकार आंगले-शिंदेवाडी (ता. राजापूर) येथे बुधवारी घडला. याप्रकरणी अल्पवयीन युवकाच्या विरोधात राजापूर पोलिसांनी भादंवि कलम ३५४ सी अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पीडित तरुणी मूळ सिंधुदुर्गातील व सध्या नोकरीनिमित्त मुंबईला वास्तव्याला आहे. ती आपल्या कुटुंबासह आंगले-शिंदेवाडी येथील मामाच्या घरी उन्हाळी सुट्टीत राहण्यासाठी आली होती. मामाचे घर साधे आहे. ही पीडित बुधवारी सकाळी तरुणीच्या मावशीची मुलगी तसेच बहीण अंघोळ करून बाहेर आल्या. त्यानंतर पीडित तरुणी अंघोळीसाठी गेली असता बाथरूमची भिंत आणि छप्पर यांच्यामध्ये असलेल्या मोकळ्या जागेत मोबाईल व कॅमेरा दिसला.

तिने आरडाओरड केली असता कुटुंबीयांनी धाव घेतली. त्यानंतर घराच्या बाथरूमला लागून असलेल्या घरात जाऊन पाहिले. त्यावेळी घरात कुणी राहत नसताना त्या घरात एक युवक लपून बसल्याचे त्यांनी पाहिले. या युवकाचा मोबाईल तपासला असता, मोबाईलच्या रिसायकल बिनमध्ये पीडित तरुणीचे अंघोळ करताना शूटींग केलेले दोन व्हिडीओ आढळले. पीडितेने आरडाओरड केल्यानंतर त्याने व्हिडीओ डिलीट केल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक मधुकर मौळे करीत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारी