दुकानाची वाट अडविणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:33 IST2021-03-23T04:33:15+5:302021-03-23T04:33:15+5:30
रत्नागिरी : शहरातील एम. जी. रोड येथील एका दुकानाची वाट साईनबोर्ड आणि चिरे लावून अडविण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी ...

दुकानाची वाट अडविणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी : शहरातील एम. जी. रोड येथील एका दुकानाची वाट साईनबोर्ड आणि चिरे लावून अडविण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी दोघांविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी, २१ मार्च रोजी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
अनिकेत यशवंत पाध्ये (वय ३२, रा. एम. जी. रोड, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे अनिकेत पवार (रा. काँग्रेस भुवन, रत्नागिरी) आणि निखिल चव्हाण (रा. क्रिस्टल बिल्डिंग भाजी मार्केट, रत्नागिरी) अशी आहेत.
त्यांच्याविरोधात रविवारी दुपारी संशयितांनी पाध्ये यांच्या यश इलेक्ट्रॉनिक्स दुकानासमोरील उभ्या पोलला साईनबोर्डचा पत्रा नायलॉन दोरीने बांधून त्यापलीकडे चिरे लावून त्यांची येण्या-जाण्याची वाट अडवली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हेडकाॅन्स्टेबल दिनेश हरचकर करत आहेत.