शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

तिवरे धरण फुटीप्रकरणी दोषारोप दाखल करा, पुनर्विलोकन समितीच्या अहवालाने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 17:49 IST

तिवरे धरणफुटीची दुर्घटना २ जुलै २०१९ रोजी घडली होती. या घटनेत २३ जणांचा बळी गेला होता.

चिपळूण : तीन वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलेल्या चिपळुणातील तिवरे धरण दुर्घटनेला कारणीभूत असलेल्या ठेकेदारासह अधिकाऱ्यावर दोषारोप दाखल करून त्यांची विभागीय चौकशीची कार्यवाही सुरू करावी, अशा सूचना राज्य सरकारतर्फे पुणे येथील मृद व जलसंधारण प्रादेशिक क्षेत्राचे अप्पर आयुक्त यांना दिल्या आहेत. पुनर्विलाेकन समितीच्या एका अहवालाद्वारे या सूचना दिल्या आहेत.तिवरे धरणफुटीची दुर्घटना २ जुलै २०१९ रोजी घडली होती. या घटनेत २३ जणांचा बळी गेला होता. दुर्घटनेच्या चौकशीसाठी विशेष चौकशी समिती नेमली होती. त्यात काही आक्षेप नोंदविल्याने पुनर्विलोकन समिती स्थापन केली होती. या समितीने अहवाल सादर केला आहे. पुनर्विलोकन समितीच्या सूचनेनुसार, ठेकेदारावर स्वीकृत निविदेच्या अटी, शर्तीनुसार कारवाई करावी, धरणांच्या संकल्पनाची प्रचलित पद्धती व प्रत्यक्ष संकल्पना तपासून दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, सिंचन विमोचकाचे प्रत्यक्ष काम सुरू असताना गुणनियंत्रण शाखा अभियंता, उपविभागीय अभियंता यांची शासन निर्देश, निविदा शर्तीच्या अनुषंगाने विभागीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, असे म्हटले आहे.धरणाची प्रथम गळती निदर्शनास आल्यापासून धरणफुटीची घटना घडेपर्यंत, देखभाल व दुरुस्ती, वरिष्ठ स्तरावर उपाययोजनांबाबत अवगत न करणे, धरणाच्या खालील बाजूस असणारी लोकवस्ती न हटविणे, त्रुटीपूर्ण पावसाळापूर्व व पावसाळ्यानंतरची तपासणी करण्यासाठी जबाबदार शाखा अभियंता, उपविभागीय अभियंता, संबंधित कार्यकारी अभियंता यांची तसेच महसूल विभागातील जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांची विभागीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, असेही या अहवालात म्हटले आहे.

अहवालातून समितीने दिली क्लीन चिटतिवरे धरणात २ जुलै २०१९ रोजी सकाळी ९ वाजता पाण्याची पातळी १३२ मीटर इतकी होती. सायंकाळी ५ वाजता पाणीपातळी १३९ मीटर होती. त्यानंतरही पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच होता. दोषींवर कारवाई करताना या बाबींचा विचार करावा, असे समितीने सूचित करत एक प्रकारे क्लीन चिट दिली आहे.

पुनर्विलाेकन समितीचा अहवाल मिळविण्यासाठी प्रथम जिल्हाधिकारी, त्यानंतर रत्नागिरीतील जलसंधारण, ठाणेतील जलसंधारण कार्यालय व तेथून पुण्यातील मृद व जलसंधारण विभागाचे प्रादेशिक कार्यालय गाठले. या सर्वांकडे अहवाल मिळाला नाही. जलसंधारण प्रधान सचिवांकडे समितीचा अहवाल माहिती अधिकारात उपलब्ध झाला. - विद्याधर साळुंखे, माहिती अधिकार कार्यकर्ते

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDamधरण