शहरं
Join us  
Trending Stories
1
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
2
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
3
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
4
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
5
दोन दशकांची मैत्री; पीएम मोदी आणि पुतिन यांची पहिली भेट कधी झालेली? पाहा फोटो...
6
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
7
काहींना टबमध्ये बुडवलं तर काहींना...; 'सायको काकी'ची थरकाप उडवणारी मोडस ऑपरेंडी
8
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
9
आता 'या' राज्यात महिलांच्या खात्यात 2100 नाही, थेट 6300 रुपये जमा होणार! सरकारचा मोठा निर्णय, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितला नवा 'प्लॅन'
10
प्रेमाच्या नादात दोन मुलांच्या आईचं 'कांड', पतीला दिला धोका; बहिणीचा संसार, सुरू होण्याआधीच मोडला!
11
Travel : पुतिन यांच्या रशियात फिरायला जायचा विचार करताय? किती खर्च येईल आणि कुठे कुठे फिराल? जाणून घ्या..
12
“महायुती सरकार बौद्धिक, आर्थिक दिवाळखोरीत; शेतकरी, लाडक्या बहिणींना फसवले”: हर्षवर्धन सपकाळ
13
30 दिवस, 14000 उड्डाणे रद्द, Indigo अडचणीत येण्याचे काय कारण? परिस्थिती कधी सुधारेल?
14
भाईंदरमध्ये मराठी माणसाला फ्लॅट नाकारला? जैन, मारवाडी, ब्राह्मण असाल तरच घर; बिल्डर लॉबीचा मनमानी कारभार
15
२००० मंत्र, २०० वर्ष असाध्य; १९ वर्षीय देवव्रतने ५० दिवसात केलेले दंडक्रम पारायण नेमके काय?
16
मोबाईलच्या चार्जरमुळे मुलाला लागला शॉक; तुमच्यासोबतही घडू शकते दुर्घटना! 'या' चुका आधीच टाळा
17
FD पेक्षा जास्त परतावा देणाऱ्या 'या' ३ सरकारी योजना: तुमचे भविष्य होईल सुरक्षित, टॅक्समध्येही मोठी सूट!
18
वैभव सूर्यवंशीने केली अर्जुन तेंडुलकरची जोरदार धुलाई, ४ चौकार-४ षटकारांंसह ठोकले ४६ धावा
19
Video - "राहुल गांधींनी भाजपामध्ये सामील व्हावं, देवाने तुम्हाला..."; कंगना राणौतचा खोचक सल्ला
20
पंतप्रधान मोदींसोबत कारमध्ये काय चर्चा झाली? पुतिन यांनी सांगितला चीनमधील 'तो' किस्सा...
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: चिपळुणात स्मशानभूमीत नातेवाइकांमध्ये हाणामारी, चौघांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 16:55 IST

नातेवाईक अंत्यदर्शनासाठी पाचच मिनिटांत येत आहेत, थोडा वेळ थांबलात तर बरं होईल अशी विनवणी करणाऱ्या तरुणाला स्मशानभूमीत मारहाण

चिपळूण (जि. रत्नागिरी) : आपले नातेवाईक अंत्यदर्शनासाठी पाचच मिनिटांत येत आहेत, थोडा वेळ थांबलात तर बरं होईल, अशी विनवणी करणाऱ्या तरुणाला भर स्मशानभूमीत चौघांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील पिंपळी येथे मंगळवारी सकाळी ११ वाजता घडला. यामध्ये फिर्यादी प्रशांत पोपट चव्हाण (३३, सध्या रा. आकले, चिपळूण, मूळ रा. कळकवणे, दादर, चिपळूण) हा जखमी झाला आहे.या मारहाणप्रकरणी किरण बाळू जाधव (सध्या रा. पिंपळी, मूळ रा. पाटण, सातारा), मगट व्यंकट जाधव, अविनाश मगट जाधव, सौरभ सुनील जाधव (सर्व रा. तळदेव, महाबळेश्वर, सातारा), असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.प्रशांत चव्हाण हे त्यांची सख्खी मामी कविता बाळू जाधव यांच्या अंत्यविधीकरिता पिंपळी खुर्द येथील स्मशानभूमीत गेले होते. तेथे त्यांचे इतर नातेवाईक जमलेले होते. आपले आई-वडील व इतर नातेवाईक थोड्याच अंतरावर असून, ते अंत्यविधीकरिता येत आहेत, थोडा वेळ थांबा, त्यांना पण दर्शन घेऊ द्या, असे आपण जमलेल्या नातेवाइकांना सांगितले. काही नातेवाइकांनी थांबायचे नाही, अग्नी द्या, असे सांगितले. त्याला इतर नातेवाइकांनी दुजोरा दिला. तेथे जमलेल्यांपैकी किरण जाधव याने तेथेच असलेला दगड आपल्या डोक्यात मारला, तसेच मगट जाधव, अविनाश जाधव, सौरभ जाधव यांनीही आपल्याला मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केली, असे प्रशांत चव्हाण यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri: Brawl at Crematorium over Funeral Delay, Four Booked

Web Summary : A man was assaulted at a Ratnagiri crematorium for requesting a delay in the funeral until relatives arrived. Four individuals, including Kiran Jadhav, have been charged in connection with the incident at Pimpli village.