शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

निवासी प्रयोगभूमी केंद्रात रंगला उत्सव

By admin | Updated: January 3, 2015 00:12 IST

वैविध्यपूर्ण कार्यक्रम : तीस वर्षांच्या कोकणातील कामांचा अनुभव

चिपळूण : प्रयोगभूमीचा वार्षिक उत्सव म्हणजे आनंदोत्सवच. गेली १० वर्षे हा आनंदोत्सव वैविध्यपूर्ण रितीने साजरा केला जातो. यावर्षीचा कार्यक्रमही आगळ्यावेगळ्या प्रकारे साजरा करण्यात आला. श्रमिक सहयोग या गेली ३० वर्षे कोकणात असलेल्या संस्थेने चालविलेल्या प्रयोगभूमी या निवासी शैक्षणिक केंद्राचा हा प्रयोगभूमी उत्सव चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी या सह्याद्री पर्वताच्या निसर्गरम्य गावात वसलेली ही प्रयोगभूमी. सभोवतालच्या परिसरातील पशू-पक्ष्यांच्या सुरात सूर मिसळून बागडणारी, नांदणारी येथील मुले-माणसे. अशी प्रयोगभूमी हे दोन दिवस बाहेरील पाहुण्यांनी फुलली, बहरलेली होती. प्रा. मधु जाधव यांच्या हस्ते या उत्सवाचे उद्घाटन झाले. डी. बी. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्याम जोशी यांनी दलितमित्र रघुवीर तथा तात्या कोवळे यांनी लिहिलेल्या एकांकिकेचे प्रकाशन केले. या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षपद निवृत्त प्राचार्य डॉ. सुरेश जोशी यांनी स्वीकारले. यावेळी श्रमिकचे अध्यक्ष दादा रोंगे, उपाध्यक्ष डॉ. जी. बी. राजे, सदस्य प्रमोद जाधव, रेखा राणे, शरयु हुजरे, सुषमा इंदुलकर हे उपस्थित होते. प्रयोगभूमीचा १० वर्षांचा प्रवास संतोष पुरोहित यांनी चित्रफितीद्वारे मांडला. या वाटचालीत सहभागी झालेले राजन इंदुलकर, मंगेश मोहिते, रेखा मोहिते, विजय कदम, डॉ. विजय साठे, अरुण मोहिते यांना प्रश्न विचारुन बोलते करण्यात येत होते. त्यामुळे हा प्रवास जिवंतपणे सर्वांसमोर उभा राहात होता. दुसऱ्या सत्राचे संचालन युवराज मोहिते यांनी केले. साहित्यिक अरुण काकडे, अभिजीत हेगशेट्ये, जतीन देसाई, डॉ. बाबा आमटे यांचे २५ वर्षांचे सहकारी मुकुंद दीक्षित, डॉ. विजय साठे यांनी विचार मांडले. शेवटी विस्तृत मांडणी जनआंदोलनातील झुंजार कार्यकर्त्या उल्का महाजन यांची होती. भांडवलदार वर्गाच्या विकास कल्पनेसाठी आपण बहुजनांच्या जीवनाधारेचा बळी घेत आहेत, याची जाण आपल्याला आहे का? असा निर्वाणीचा प्रश्न त्यांनी यावेळी उभा केला. रुस्तुम तांबे, मेघन मोहिते, स्नेहल एकबोटे, मंगेश शिरधनकर, प्रथमेश जाधव, शाहीन इंदुलकर, राधा प्रधान, डॉ. अजय राजेशिर्के, स्मृती तिवाडकर, पूजा यादव, नितेश धावडे, सदाफ कडवेकर यांनी यावेळी विचार मांडले. (प्रतिनिधी)