शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
3
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
4
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
5
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
6
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
7
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
9
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
10
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
11
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
12
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
14
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

सवतकड्यावरील जीवघेणा प्रसंग, धो-धो पाऊस, वादळ अन् बचावाचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 4:55 PM

रत्नागिरीतील रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सच्या सदस्यांनी जीवाचे रान केले आणि राजापूर तालुक्यातील चुनाकोळवण येथील सवतकडा धबधब्यामध्ये अडकलेल्या १३ पर्यटकांना जीवदान दिले. दोन वाजता सुरू झालेली ही मोहीम तब्बल तीन तासांनी फत्ते झाली.

ठळक मुद्देसवतकड्यावरील जीवघेणा प्रसंग, धो-धो पाऊस, वादळ अन् बचावाचा थरारतेराजणांना वाचवणाऱ्या रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सची उत्तुंग कामगिरी

रत्नागिरी : वेळ दुपारी साडेबाराची, पण मुसळधार पावसामुळे मावळतीनंतर असतं तसं वातावरण, सोसाट्याचा वारा जणू वादळच, एरवी मनोहरी वाटावा अशा धबधब्याने घेतलेलं अक्राळविक्राळ रूप आणि तशातच मदतीसाठी झालेला पुकारा. जवळजवळ दोन हजार पर्यटक आणि प्रत्यक्ष मदतकार्य करणारे सहाजण.

चौघेजण पाण्याच्या वेगवान प्रवाहात मधोमध झाडांच्या तुकड्याचा आधाराने उभे राहिलेले आणि नऊजण प्रवाहाच्या विरूद्ध दिशेला. साऱ्यांना मदतीचा हात देणे गरजेचं. तिथून पुढे तब्बल तीन तास याच वातावरणात सुरू असलेला बचावाचा थरार.. रत्नागिरीतील रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सच्या सदस्यांनी जीवाचे रान केले आणि राजापूर तालुक्यातील चुनाकोळवण येथील सवतकडा धबधब्यामध्ये अडकलेल्या १३ पर्यटकांना जीवदान दिले. दोन वाजता सुरू झालेली ही मोहीम तब्बल तीन तासांनी फत्ते झाली.१३ पर्यटकांचा जीव वाचवणाºया या ह्यरत्नदुर्गह्णच्या रत्नांचा ह्यलोकमतह्णच्या रत्नागिरी कार्यालयात सोमवारी सायंकाळी सत्कार करण्यात आला. तेव्हा त्यांनी हा थरार मांडला. रत्नदुर्गचे जितेंद्र शिंदे म्हणाले की, सवतकडा १८० फुटांचा असून, अत्यंत सुरक्षित असा हा धबधबा आहे. रविवारी संस्थेने या वॉटरफॉलवर रॅपलिंग अ‍ॅक्टिव्हिटी आयोजित केली होती.

रविवारी सकाळी पाऊस कमी होता. दुपारपर्यंत रॅपलिंग सुरू होते. दुपारनंतर अचानक सारा नूरच पालटला. पाणी वाढल्याने संस्थेचे सदस्य रॅपलिंगची आधीची जागा सोडून सुरक्षित जागी गेले. परंतु अवघ्या १५ मिनिटात तेथील १ फूट उंचीचे पाणी तीन फूट झाले. त्यामुळे आम्ही परतीची तयारी करत होतो आणि कोणीतरी मदतीसाठी आवाज दिला.कड्याच्या खाली पाण्यात मध्यभागी दोघे फसले होते. त्याखालील कड्यावर आणखी दोघे फसलेले होते. त्यांना प्रथम वाचविणे आवश्यक होते. रत्नदुर्गच्या सदस्यांनी रॅपलिंगचा रोप झाडाला बांधला. मधोमध फसलेल्या दोघांना रोप टाकून सुरक्षितरित्या बाहेर काढले गेले. त्यानंतर कड्याच्या खालच्या बाजूला झाडांमध्ये फसलेल्या इतर दोघांना वाचविण्यासाठी अक्षय व सूरज हे दोघेही सरसावले. त्यांना वाचविण्यात आले. त्यानंतर एका झाडाला रोप बांधून पलिकडच्या बाजूला अडकलेल्या आणखी ९ जणांना वाचवण्यात आले.बचाव कार्याच्या वेळी सर्वांचीच धावाधावधबधब्याने उग्र रुप धारण केल्यानंतर सर्वांचीच पळापळ झाली. बचाव कार्यासाठी आम्हाला यंत्रणा लावताना, रोप फिक्स करण्यासाठी या गर्दीतून वाट काढताना अमेय पावसकरसारख्या पर्यटकाने खूप मदत केली. रोप फिक्स करून नंतर रोप त्या अडकलेल्या पर्यटकांकडे टाकला. त्यांनीही योग्य साथ दिल्याने त्यांना वाचविणे शक्य झाले. या प्रकारे सर्व १३ जणांना वाचविण्यात आले, असे रत्नदुर्गचे फिल्ड इन्चार्ज गणेश चौगुले यांनी सांगितले. यावेळी फिल्ड इन्चार्ज जितेंद्र शिंदे, संस्थेचे उपाध्यक्ष विरेंद्र वणजु, खजिनदार शैलेश नार्वेकर, सदस्य पराग सुर्वे, विक्रम चौगुले, प्रांजल चोप्रा, सूरज बावने, हर्ष जैन उपस्थित होते. ह्यलोकमतह्णतर्फे त्यांचा गौरव करण्यात आला.रत्नदुर्ग ऐन तारुण्यात!रत्नागिरीतील रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स या संस्थेने आता पंचवीशीत म्हणजेच ऐन तारुण्यात पदार्पण केले आहे. या पंचवीशीपर्यंतच्या वाटचालीत गिर्यारोहणअंतर्गत येणारे रॅपलिंग, ट्रेकिंग, गिर्यारोहणाचे निवासी शिबिर, व्हॅली क्रॉसिंग, हिमालयीन ट्रेक यांसारखे उपक्रम संस्थेमार्फत राबविण्यात आले व राबविले जात आहेत. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीतून आपत्कालिन स्थितीत बचावकार्यातही संस्थेचा सहभाग आहे.पर्यटक सुरक्षा महत्त्वाचीचसवतकड्याच्या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना आवश्यक आहे. जिल्हाधिकारीपदी विकास रस्तोगी असताना त्यांनी या ठिकाणापर्यंत रस्त्याची कामगिरी सुरू केली होती. या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य हवेच, असे रत्नदुर्गचे उपाध्यक्ष विरेंद्र वणजु म्हणाले. शासन सांगत असेल तर स्थानिक तरुणांना सुरक्षिततेबाबत प्रशिक्षण देण्याची रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सची तयारी आहे, असे जितेंद्र शिंदे म्हणाले. 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Ratnagiriरत्नागिरी