शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

फाटली जाळी अन खिसाही!

By admin | Updated: January 14, 2015 00:41 IST

वाऱ्यामुळे मासे किनाऱ्यावर : गाळाने मच्छिमारांचा घास हिरावला...

मेहरुन नाकाडे - रत्नागिरी -उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग अधिक असल्यामुळे थंडीचा कडाका वाढतो आहे. याच कालावधीत मासे किनाऱ्यालगत येतात. परंतु सागरी किनारे गाळाने भरलेले असल्याने, त्यात जाळी फाटून नौका मालकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. जाळ्यांच्या किमती लाखांमध्ये असल्याने संबंधित मच्छिमारांचे नुकसान होत आहे. या जाळ्यांबरोबरच खिशालाही चाट बसत आहे. त्यामुळे मच्छिमार आर्थिक संकटात सापडला आहे.रत्नागिरी जिल्ह्याला १५७ किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. किनारपट्टीवरील १०४ गावांतील १४ हजार ८१६ कुटुंब मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहेत. डिसेंबर ते फेब्रुवारीअखेर वारे उत्तरेकडून वाहत असल्याने, वाऱ्याला वेग अधिक असतो. शिवाय समुद्रातील लाटांनाही विशिष्ट प्रकारचा करंट असतो. त्यामुळे मासे किनाऱ्यालगत येतात. परंतु किनाऱ्यावरील गाळ उपसा होत नसल्यामुळे, जाळी चिखलात अडकून फाटतात. जाळ्यांच्या किमती ७ ते २५ लाखांच्या आसपास आहेत. एक जाळे फाटले, तर दुरूस्तीकरिता चार ते पाच दिवस सहज जातात. परंतु त्याकरिता २० ते २५ कारागिर जाळी दुरूस्तीकरिता बसवावे लागतात. जाळी विणणाऱ्या कारागिरांची दिवसाची मजुरी ४०० रूपये आहे. कारागिरांची मजुरीच दिवसाला ८ ते १० हजार इतकी होते. त्यामुळे जाळी दुरूस्तीकरिता किमान ४० ते ५० हजार रूपये खर्च सहज येतो. मात्र, त्या मानाने मासे मिळत नसल्याने, मच्छिमारांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. आधीच वातावरणात कायम बदल होत असल्याने, मच्छिमारीवर परिणाम होत असताना आता ही नवीन समस्या भेडसावू लागली आहे.वाऱ्याच्या वेगामुळे खोल समुद्रात नौका घालण्यास मच्छिमार धजावत नाहीत. शिवाय माशांचे उत्पादन या काळात कमी असल्याने खलाशी पगार, इंधनखर्च, देखभाल दुरूस्ती खर्च, बर्फ यामुळे मच्छिमारांचा खर्च वसूल होत नाही. शिवाय जाळी फाटल्यामुळे मच्छिमारांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. - शब्बीर होडेकर,उपाध्यक्ष मिरकरवाडा आदर्श मच्छिमार सहकारी सोसायटी.उत्पादन मेट्रीक टनमध्येवर्षउत्पन्न२००५-०६१,०५,०६९२००६-०७१,०९,०५५२००७-०८८५,०९९२००८-०९७२,१२२२००९-१०७५,१२२२०१०-११९५,९५०२०११-१२८८,४३८२०१२-१३ ८७,६९०२०१३-१४१,०६,६५२