शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
2
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
3
५ लाखांपर्यंतचे उपचार फ्री! आता घरबसल्या बनवा 'आयुष्मान कार्ड'! 'या' कागदपत्रांची आवश्यकता
4
SIR मुळे पश्चिम बंगालमधील 23 बीएलओंचा मृत्यू? सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला 'हे' निर्देश
5
लग्न पुढे ढकललं... पोस्ट डिलीट... उलटसुलट चर्चा...; अशातच स्मृती मंधानाचा आणखी एक मोठा निर्णय, जाणून घ्या
6
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
7
Gautam Gambhir: गंभीरच्या कोचिंगमध्ये टीम इंडिया सुपर फ्लॉप; ११ लाजिरवाण्या विक्रमांची नोंद!
8
टीम इंडियाने 'बुटका' म्हणून हिणवलं, विजयानंतर बवुमा म्हणाला- आता आत्मविश्वास आणखी वाढलाय...
9
संविधान दिन २०२५: PM नरेंद्र मोदींचे देशाला खुले पत्र; म्हणाले, “निवडणुकीत मतदानाची संधी...”
10
काजू, बदाम, पिस्ता आणि शेरनी बाई...; मतदार यादी पाहून अधिकारीही झाले थक्क! हटके नावांमागे कारण काय?
11
“भाजपाची ठोकशाही सहन करणार नाही, सत्तेचा माज उतरायला वेळ लागणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
12
मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस नेत्याला गाडीत कोंबून मारहाण; आरोपीचा व्हिडीओ समोर आल्याने नवा ट्विस्ट
13
थार मालकाची सटकली...! हरियाणाच्या DGP ना कायदेशीर नोटीस पाठविली, म्हणाला, मी ३० लाख मोजून...
14
आज अर्ध्या किमतीत मिळतोय HDFC AMC चा शेअर; का चर्चेत आहे हा स्टॉक?
15
"घरात चाललीय मी ज्यांच्या ते आहेत महाराष्ट्राचे होम मिनिस्टर...", पूजाने घेतला सोहमच्या नावाचा हटके उखाणा
16
“आमच्या उमेदवाराला विजयी करा अन् १० लाख मिळवा”; भाजपा नेत्याची अख्ख्या गावाला खुली ऑफर
17
Satara Accident Video: रस्ता ओलांडण्यापूर्वीच मृत्यूची झडप! फलटणमध्ये मिनी बसने डिव्हायडर तोडत चिरडले
18
लिव्ह-इन पार्टनरला संपवलं? तरुणीचा मृतदेह रुग्णालयात सोडून प्रियकर पसार; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
19
SMAT: सीएसकेच्या उर्विल पटेलचं वादळी शतक; १८३ धावांचे लक्ष्य अवघ्या १२.३ षटकांत गाठले!
20
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

पोस्टाच्या भरतीत दहावीचे बाेगस प्रमाणपत्र, रत्नागिरीत प्रकार उघडकीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 14:07 IST

लातूर, नांदेडमधील दोघांवर गुन्हा दाखल; दाेघांची नियुक्ती रद्द

रत्नागिरी : पाेस्टाच्या भरतीत बाेगस प्रमाणपत्र बनवून ती खरी असल्याचे भासवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार रत्नागिरी मुख्य डाकघर कार्यालयात सन २०२३ मध्ये घडला असून, याप्रकरणी लातूरनांदेड येथील दाेघांवर शहर पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत रत्नागिरी पाेस्ट कार्यालयातील सहायक डाकघर अधीक्षक ज्ञानेश श्रीपाद कुलकर्णी (वय ३८, रा. खारेघाट राेड, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अनंत माराेती शेळके (२२, रा. काेकणगा, लातूर) व लंकाेश नामदेव राठाेड (२५, रा. शिरढाेण, ता. कंधार, नांदेड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ३१ जुलै २०२३ ते २१ नाेव्हेंबर २०२३ या कालावधीत घडला आहे. संशयित दाेघांनी राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्था, नाेएडा यांचे बाेगस प्रमाणपत्र बनविली हाेती. या प्रमाणपत्रांचा वापर त्यांनी पाेस्टाच्या भरतीमध्ये केला हाेता.मात्र, हा प्रकार निदर्शनास येताच सहायक डाकघर अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांनी बाेगस प्रमाणपत्रांद्वारे शासनाची दिशाभूल करून फसवणूक केल्याची फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनंतर २४ नाेव्हेंबर २०२५ राेजी रत्नागिरी शहर पाेलिस स्थानकात भारतीय दंडविधान संहिता कायदा कलम ४६५, ४६८, ४७१ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.दहावीचे बाेगस प्रमाणपत्रसंपूर्ण महाराष्ट्रात दर सहा महिन्यांनी पाेस्टात शाखा डाकपाल, डाक वितरक, डाकसेवक या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येते. ही संपूर्ण भरती प्रक्रिया ऑनलाइन हाेते. दहावीच्या गुणांवर उमेदवाराची निवड केली जाते. सन २०२३ मध्ये झालेल्या भरतीत दाेघांनी दहावीचे प्रमाणपत्र जाेडले हाेते. मात्र, हे प्रमाणपत्र बाेगस असल्याचे पुढे आले आहे.

पडताळणीत प्रकार उघडभरतीसाठी दाेघांनी ऑनलाइन जाेडलेल्या कागदपत्रांची पडताळणी करताना दहावीच्या प्रमाणपत्राची माहिती संबंधित बाेर्डाच्या संकेतस्थळावर मिळाली नाही. त्यामुळे ही प्रमाणपत्रे संबंधित बाेर्डाकडे पाठविण्यात आली. त्यावेळी बाेर्डाकडून ही प्रमाणपत्रे आमच्याकडील नसल्याचे सांगण्यात आले. अधिक पडताळणी केल्यानंतर ही प्रमाणपत्रे खाेटी असल्याचे निष्पन्न झाले.

दाेघांची नियुक्ती रद्ददाेघांनी जाेडलेल्या कागदपत्रांच्या आधारे त्यांची भरती प्रक्रियेत निवडही करण्यात आली हाेती. चिपळूण व दापाेली येथे त्यांची नियुक्ती करण्यात आली हाेती. मात्र, पडताळणीदरम्यान प्रमाणपत्रांबाबत शंका आल्याने त्यांची नियुक्ती राेखण्यात आली. त्यानंतर बाेगसगिरी समाेर येताच दाेघांचीही नियुक्ती रद्द करण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri: Fake 10th certificates used in postal recruitment exposed.

Web Summary : A scam involving fake tenth-grade certificates in postal recruitment surfaced in Ratnagiri. Two individuals from Latur and Nanded are accused of using forged documents to secure positions. Authorities discovered the fraud during verification, leading to the cancellation of their appointments and a police investigation.