कशेडी येथे शिक्षकांसाठी सुविधा उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:51 IST2021-05-05T04:51:12+5:302021-05-05T04:51:12+5:30

खेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना कशेडी घाटात नियुक्ती देण्यात आली आहे. मात्र, या ठिकाणी कोणत्याही सुविधा नसल्याने ...

Facilities available for teachers at Kashedi | कशेडी येथे शिक्षकांसाठी सुविधा उपलब्ध

कशेडी येथे शिक्षकांसाठी सुविधा उपलब्ध

खेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना कशेडी घाटात नियुक्ती देण्यात आली आहे. मात्र, या ठिकाणी

कोणत्याही सुविधा नसल्याने त्यांची गैरसाेय हाेत हाेती. याबाबत खेड प्राथमिक शिक्षक समितीने मागणी केली हाेती. त्यानंतर, या ठिकाणी शिक्षकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने याबाबत प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने यांची भेट घेऊन सुविधा पुरवण्याबाबत चर्चा केली हाेती. प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने, तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर कशेडी तपासणी नाक्यावर तंबू वीज, पाणी व सॅनिटायझर यांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे या ठिकाणी ड्युटी बजावणाऱ्या शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. या ठिकाणी दोन सत्रांत शिक्षक ड्युटी बजावत आहेत.

प्रांताधिकारी सोनोने यांच्यासमवेत झालेल्या चर्चेदरम्यान, प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष शरद भोसले, प्राथमिक शिक्षक संघाचे

अध्यक्ष विलास धामणे, सुखदेव पवार, सरचिटणीस अविनाश साळुखे, पदवीधर सभा जिल्हा उपाध्यक्ष महेश मचडे, जुनी पेन्शन हक्क संघटना सचिव गणेश सानप, पुरोगामी शिक्षक समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण, उर्दू शिक्षक संघटनाध्यक्ष अखलाख परकार, मुख्याध्यापक संघटना सचिव अशोक

मगदूम उपस्थित होते.

Web Title: Facilities available for teachers at Kashedi