आवाशी (जि. रत्नागिरी) : खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील डॉ. खान केमिकल ॲण्ड कन्सल्टंट कंपनीत भीषण स्फाेट हाेऊन नऊ कामगार जखमी झाले असून, त्यापैकी चाैघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही दुर्घटना शुक्रवारी (६ मार्च) दुपारी अडीचच्या सुमाराला घडली. या स्फाेटाची तीव्रता इतकी भयंकर होती की, आजूबाजूच्या कंपनीच्या खिडक्यांची तावदाने ही हलली.जखमींमध्ये सख्खे भाऊ नंदकिशोर राणे व रणजित राणे (रा. दाभिल, ता. खेड) यांच्यासह सुजन दास (रा. आवाशी), बिपीन मोरे (रा. शिरळ ता. चिपळूण), रघुनाथ खामकर (रा. मुरडे, ता. खेड), शिवानंद खोंडे (रा. लोटे घाणेखुंट), असद खान, अरमान शाह, समीर शेख यांचा समावेश आहे.जखमींमधील नंदकिशोर राणे, रणजित राणे, सुजन दास, बिपीन मोरे या चाैघांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. त्यांना तातडीने लाइफ केअर हाॅस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. मात्र, यातील नंदकिशोर राणे आणि रणजित राणे यांची प्रकृती अधिकच चिंताजनक बनल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला नेण्याच्या हालचाली सुरू हाेत्या. मात्र, याबाबत कंपनीकडून काेणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.या दुर्घटनेची माहिती मिळताच औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दल, खेड पोलिस, लोटे गावचे मंडळ अधिकारी, महिला तलाठी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. कंपनीत आग लागताच अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. या मदत कार्यात आजूबाजूच्या कंपनीचे अधिकारी, कामगार व ग्रामस्थांनीही सहभागी झाले हाेते.
Web Summary : A blast at Dr. Khan Chemical Company in Ratnagiri injured nine workers, four critically. The explosion's impact shook nearby buildings. Injured workers were rushed to the hospital, with some transferred to Mumbai for advanced care. Firefighters and local authorities responded quickly to control the situation.
Web Summary : रत्नागिरी के डॉ. खान केमिकल कंपनी में विस्फोट से नौ मजदूर घायल हो गए, जिनमें से चार की हालत गंभीर है। धमाके से आसपास की इमारतें हिल गईं। घायलों को अस्पताल ले जाया गया, कुछ को मुंबई स्थानांतरित किया गया। दमकल कर्मियों और स्थानीय अधिकारियों ने तुरंत स्थिति को नियंत्रण में किया।