कृषी वीज बिल माफ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:31 IST2021-03-26T04:31:13+5:302021-03-26T04:31:13+5:30

मंडणगड : संभाजी ब्रिगेड, तालुका शाखा मंडणगडतर्फे महावितरण कार्यालयास भेट देऊन कृषी वीज बिल व वीजतोडणीबाबत महावितरण उपकार्यकारी ...

Excuse the agricultural electricity bill | कृषी वीज बिल माफ करा

कृषी वीज बिल माफ करा

मंडणगड : संभाजी ब्रिगेड, तालुका शाखा मंडणगडतर्फे महावितरण कार्यालयास भेट देऊन कृषी वीज बिल व वीजतोडणीबाबत महावितरण उपकार्यकारी अभियंता, मंडणगड यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे कृषी वीज बिल माफ करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यावेळी रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष भरत सरपरे, तालुका कार्याध्यक्ष श्रीकांत जाधव, सल्लागार चिंतामणी गायकवाड, कोषाध्यक्ष विजय अधिकार, शहर उपाध्यक्ष राजेंद्र शिगवण, शहर संघटक गणेश भागवत, आदी उपस्थित होते. या निवेदनातील माहितीनुसार निसर्ग चक्रीवादळाने ग्रस्त झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांची भरमसाट कृषी वीज देयके माफ करण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्यंा कृषी पंपाची वीज बिले माफ करून देयके अदा न केलेल्या पंपाचे वीज तोडणी अभियान थांबविण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

Web Title: Excuse the agricultural electricity bill