मुंबई-गोवा महामार्ग तयार होण्यापूर्वीच पडले काँक्रीटीकरणाला खड्डे, कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 01:49 PM2023-06-24T13:49:15+5:302023-06-24T13:49:38+5:30

मुंबई-गोवा चौपदरीकरणाच्या कामाला गती, मात्र काही भागात रस्ता खचल्याने निकृष्ट कामाचा उत्तम नमुना उजेडात

Even before the completion of the Mumbai-Goa highway concreting potholes fell | मुंबई-गोवा महामार्ग तयार होण्यापूर्वीच पडले काँक्रीटीकरणाला खड्डे, कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

मुंबई-गोवा महामार्ग तयार होण्यापूर्वीच पडले काँक्रीटीकरणाला खड्डे, कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

googlenewsNext

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाअंतर्गत अत्यंत घाईघाईने सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाला वालोपे येथे आतापासूनच खड्डे व तडे गेले आहेत. काही भागात रस्ता खचल्याने निकृष्ट कामाचा उत्तम नमुना उजेडात आला आहे. एकीकडे तडे गेलेली गटारे ढासळलेल्या स्थितीत असतानाच आता काँक्रीटीकरणाला तडे गेल्याने या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

गेल्या काही वर्षांपासून मुंबई-गोवा चौपदरीकरणाचे काम सुरू असून, अद्याप ते पूर्णत्वास गेलेले नाही. कापसाळ ते खेरशेतदरम्यान चौपदरीकरणाच्या कामाला गती मिळाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर (रायगड) ते झाराप (सिंधुदुर्ग) या ३६६ किलोमीटरच्या चौपदरीकरणात चांगली प्रगती आहे. परंतु रत्नागिरी जिल्ह्यातील चौपदरीकरणाच्या कामाला आता वेग मिळत आहे.

तूर्तास परशुराम घाटात एकेरी मार्गाचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. दरडीच्या बाजूचे काम अजूनही शिल्लक आहे. त्यावर ठेकेदार कंपनीने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या पाच वर्षांपासून रखडलेले परशुराम घाटातील चौपदरीकरण आता हळूहळू पूर्णत्वास जात आहे.  याच जोडीला शहरातील बहादूरशेखनाका ते युनायटेड हायस्कूलदरम्यानच्या उड्डाणपुलाचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे.

एकूणच चिपळूण हद्दीत चौपदरीकरणाच्या कामास वेग आला असला, तरी काही ठिकाणी अतिशय घाईघाईने काँक्रिटीकरण केले जात आहे. विशेषतः शहरानजीकच्या वालोपे परिसरात नव्याने केलेल्या काँक्रिटीकरणास जागोजागी खड्डे पडून तडेही गेले आहेत. त्यावर पाऊस पडताच हे तडे आणखी उघडपणे दिसून येत आहे. त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. सध्या या परिसरातील काँक्रिटीकरणाचे काम बहुतांशी पूर्ण झाले आहे. परंतु काही ठिकाणी धोकादायक खड्डे पडले आहेत.

गतवर्षी कामथे घाटमाथ्याच्या जवळच काँक्रिटीकरणाचा काही भाग खचला होता. याविषयी वर्षभर ओरड झाल्यानंतर त्याची दुरूस्ती करण्यात आली. त्याचबरोबर चौदरीकरणाअंतर्गत उभारलेले दुभाजकही अनेक ठिकाणी ढासळले आहेत. कापसाळ येथेही मुख्य काँक्रिटीकरण रस्त्याला समपातळी राहिलेली नाही. अनेक ठिकाणी खड्डेही पडलेले आहेत. त्यामुळे चौपदरीकरणाच्या कामात घाई नको, असा सूर वाहतूकदारांसह ग्रामस्थांमधूनही उमटू लागला आहे.

चौपदरीकरणातील गटारांनाही अनेक ठिकाणी तडे गेलेले आहेत. चिपळूण, कळबंस्ते, वालोपे, कापसाळ येथे काही ठिकाणी गटारे कोसळलेल्या स्थितीत आहेत. तेथे दुरुस्ती गरजेचीच आहे.

पावसाळा येतोय

उशिरा सुरू होत असला तरी एकदा सुरू झाल्यानंतर पावसाचा जोर चांगलाच वाढतो. त्यामुळे काँक्रिटीकरणाला पडलेले खड्डे वाढण्याची भीती आहे. तसेच वेगात जाणाया वाहनांचा, विशेषत: दुचाकींचा या खड्ड्यांमुळे अपघात होण्याचीही शक्यता आहे.

Web Title: Even before the completion of the Mumbai-Goa highway concreting potholes fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.