जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, सुदैवाने इतर गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम नाही
By मनोज मुळ्ये | Updated: June 14, 2024 14:31 IST2024-06-14T14:30:49+5:302024-06-14T14:31:30+5:30
रत्नागिरी : इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मुंबई मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस सुमारे तासभर आरवली स्थानकात थांबली होती. दुसरे इंजिन लावल्यानंतर गाडी ...

जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, सुदैवाने इतर गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम नाही
रत्नागिरी : इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मुंबई मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस सुमारे तासभर आरवली स्थानकात थांबली होती. दुसरे इंजिन लावल्यानंतर गाडी मार्गस्थ झाली. सुदैवाने इतर गाड्यांच्या वेळापत्रकावर काही परिणाम झाला नाही.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून मडगावला जाणाऱ्या १२०५१ या जनशताब्दी एक्स्प्रेसचे इंजिन आरवली रोडनजीक नादुरुस्त झाले. सावर्डेपर्यंत ही गाडी मुळात ४० मिनिटे विलंबाने धावत होती. इंजिनातील बिघाडामुळे ती आवरली स्थानकात थांबवण्यात आली. पर्यायी इंजिन उपलब्ध झाल्यानंतर सुमारे तासभराने ही गाडी रत्नागिरीकडे मार्गस्थ करण्यात आली.
ही गाडी एकाच जागी तासभर थांबली असली तरी त्याचा अन्य गाड्यांच्या वेळापत्रकावर काहीही परिणाम झाला नसल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.