चीन विरोधात खेडमध्ये मनसेचा एल्गार, राष्ट्रध्वजाची केली होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 18:32 IST2020-06-18T18:31:42+5:302020-06-18T18:32:47+5:30
भारत- चीन यांच्या सैनिकांमध्ये लडाख सीमेवर सुरू असलेल्या चकमकीत सीमेवर तैनात असलेले २० भारतीय जवान शहीद झाल्याच्या पार्श्वभूमीवर खेड शहरातील शहरातील तीनबत्ती नाका येथे मनसेतर्फे निषेध करण्यात आला. यावेळी चीनच्या राष्ट्र ध्वजाची होळी करून चीनच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

चीन विरोधात खेडमध्ये मनसेचा एल्गार, राष्ट्रध्वजाची केली होळी
खेड : भारत- चीन यांच्या सैनिकांमध्ये लडाख सीमेवर सुरू असलेल्या चकमकीत सीमेवर तैनात असलेले २० भारतीय जवान शहीद झाल्याच्या पार्श्वभूमीवर खेड शहरातील शहरातील तीनबत्ती नाका येथे मनसेतर्फे निषेध करण्यात आला. यावेळी चीनच्या राष्ट्र ध्वजाची होळी करून चीनच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
भारतीय सीमेवर चिनी सैनिकानी आक्रमण केल्याने सीमवेर तैनात असलेले २०पेक्षा अधिक जवान शहीद झाले आहेत. तर चर्चेसाठी गेलेल्या संतोष बाबू सारख्या अधिकाऱ्यांची चिनी लष्कराने भोसकून हत्या केली. त्यामुळे देशभरात संताप व्यक्त होत आहे.
या संतापाचे पडसाद बुधवारी खेडमध्ये उमटले. मनसेचे राज्य चिटणीस तथा नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी आपल्या कार्यकर्त्या समवेत चीनच्या राष्ट्र ध्वजाची होळी केली. यावेळी नगराध्यक्ष खेडेकर यांनी चीनच्या वस्तूवर बहिष्कार टाका त्या खरेदी करू नका, असे आवाहन जनतेला केले.