गणेशोत्सवाच्या काळात विजेचा खेळखंडोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:36 IST2021-09-15T04:36:47+5:302021-09-15T04:36:47+5:30

मंडणगड : गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधीपासून तालुक्यात विजेचा खेळखंडोबा सुरु झाला असून, कोणतीही सूचना न देता अचानक होणाऱ्या या ...

Electric play during Ganeshotsav | गणेशोत्सवाच्या काळात विजेचा खेळखंडोबा

गणेशोत्सवाच्या काळात विजेचा खेळखंडोबा

मंडणगड : गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधीपासून तालुक्यात विजेचा खेळखंडोबा सुरु झाला असून, कोणतीही सूचना न देता अचानक होणाऱ्या या खेळखंडोब्यामुळे तालुकावासीय पुरते हैराण झाले आहेत.

सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोकणात अतिवृष्टीत इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यानुसार उत्तर रत्नागिरीतील काही तालुक्यात अतिवृष्टी झाली. या काळात खंडित झालेला वीज पुरवठा अद्याप सुरळीत होण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून आले आहे.

गणेशोत्सवासारख्या महत्त्वाच्या सणात विजेचा खेळखंडाेबा नाराजीचे कारण ठरत आहे. शहरासह तालुक्यातील बहुतांश गावात तालुक्यात अंधारातच गणेशाचे आगमन झाले. विजेअभावी मंडणगड शहरातील अनेक भागात गणेश उत्सव असतानाही पाणी टंचाईस सामोरे जावे लागले. महावितरण कंपनीकडून गेल्या चार दिवसात दस्तुरीतून वीज बंद केल्याचे कारण सांगितले जात आहे. कोणतीही पूर्वसूचना नसताना अनिश्चित काळासाठी वीज गायब होण्याच्या प्रकाराने लोक संतापले आहेत.

Web Title: Electric play during Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.