जिल्हा बँक अध्यक्ष निवडणूक आज, औपचारिकता बाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 12:12 IST2021-12-01T12:12:23+5:302021-12-01T12:12:53+5:30
रत्नागिरी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक बुधवार १ डिसेंबरला होणार आहे. संचालक निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवणाऱ्या सहकार ...

जिल्हा बँक अध्यक्ष निवडणूक आज, औपचारिकता बाकी
रत्नागिरी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक बुधवार १ डिसेंबरला होणार आहे. संचालक निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवणाऱ्या सहकार पॅनेलचे अध्यक्ष कृषीभूषण डॉ. तानाजीराव चाेरगे यांची बँकेच्या अध्यक्षपदी तर संचालक बाबाजी जाधव यांची बँकेच्या उपाध्यक्षपदी फेरनिवड होणार आहे.
जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सहकार पॅनेलने १९ जागा जिंकल्या. पॅनेलचे १४ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित सात जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ५ जागा सहकार पॅनेलने जिंकल्या. अन्य दोन जागांवर विरोधी उमेदवार अजित यशवंतराव आणि महेश लाखण विजयी झाले.
बँकेचे मावळते अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हेच पुन्हा त्या पदांवर विराजमान होणार आहेत. त्यासाठीची औपचारिकताच आता शिल्लक आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) सोपान शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संचालकांची बैठक होऊन त्यात निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे.