शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

Ratnagiri: क्रेडिट कार्डचे आमिष दाखवून वृद्धाला ६ लाखांचा ऑनलाइन गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 16:49 IST

दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल

चिपळूण : लाईफ टाईम क्रेडिट कार्डसाठी पुरविलेल्या माहितीतून येथील एका सेवानिवृत्त वयोवृद्ध व्यक्तीची तब्बल ६ लाखांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना २० मार्च २०२५ रोजी शहरातील बहादूरशेख नाका येथे घडली. याप्रकरणी अनोळखी दोन व्यक्तीवर चिपळूण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतची फिर्याद विजय हरी बापट (७२, रा. परांजपे स्कीम एफ-२, बहादूरशेख नाका, चिपळूण) यांनी चिपळूण पोलिस स्थानकात दिली. त्यांचे आयडीबीआय बँक शाखा चिपळूण येथे जॉईंट अकाऊंट व सेव्हिंग अकाऊंट आहे. फेसबुक या सोशल मीडियावर आलेल्या लाईफ टाईम क्रेडिट कार्डच्या एका जाहिरातीवर क्लिक करून बापट यांनी १९ मार्च २०२५ रोजी फॉर्ममध्ये स्वत:ची माहिती भरली होती.

२० मार्च रोजी त्यांच्या मोबाइलवर अनोळखी व्यक्तींनी फोन करून तुम्हाला क्रेडिट कार्ड पाहिजे का, असे त्यांना विचारले. त्यानंतर त्या अनोळखी व्यक्तीला बापट यांनी एटीएम कार्डची सर्व माहिती पुरवून पिन नंबरही सांगितला. त्यानंतर त्यांच्या बँक अकाऊंटमधून पैसे गेल्याचे बँकेच्या ॲपमधून दिसून आले.त्यांनी याबाबत खात्री केली असता त्यांच्या बचत खाते व मुदत ठेवीतील एकूण ६ लाख रुपये ऑनलाइन काढून घेऊन घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून चिपळूण पोलिस स्थानकात मोबाइलवरून संभाषण करणाऱ्या दोन अनोळखी व्यक्तींविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८ (४), माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणfraudधोकेबाजीPoliceपोलिसcyber crimeसायबर क्राइम