जिल्ह्यात आठ महिन्यांत दाेन महिला विकृत वासनेच्या शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:35 IST2021-09-22T04:35:15+5:302021-09-22T04:35:15+5:30
तन्मय दाते लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेमध्ये वाढ हाेत असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात मात्र महिलांवरील अत्याचाराचे ...

जिल्ह्यात आठ महिन्यांत दाेन महिला विकृत वासनेच्या शिकार
तन्मय दाते
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेमध्ये वाढ हाेत असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात मात्र महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी आहे. मागील आठ महिन्यांत जिल्ह्यात २ महिला वासनेच्या शिकार बनल्या आहेत. त्यामध्ये ओळखीच्या महिला, मुलींच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेणाऱ्या नराधमांना पोलिसांनी गजाआड केले आहे.
जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात अत्याचाराचे २ प्रकार घडले असून, या दाेन्ही गुन्ह्यांचा तपास करण्यात पाेलिसांना यश आले आहे. गतवर्षी नाेव्हेंबर महिन्यात चिपळूण येथे प्रकार उघडकीला आला हाेता. त्यामध्ये दोन मुली अत्याचाराच्या बळी पडल्या हाेत्या. नाेकरीचे आमिष दाखवून त्यांना चिपळूण येथे आणण्यात आले हाेते, त्यानंतर त्यांच्याकडून व्यवसाय करवून घेण्यात येत हाेता. पाेलिसांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी तपास करून या दाेन्ही मुलींची सुटका केली.
१०० टक्के गुन्ह्यांची उकल
गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्यांत अत्याचाराचे दोन प्रकार घडले आहेत. या दोन्ही गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना १०० टक्के यश आले आहे. जिल्ह्यात असे प्रकार घडत असतील, अल्पवयीन मुलींना या व्यवसायात ओढत असेल तर पाेलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गतवर्षीच्या तुलनेत झाली आहे वाढ
- गेल्यावर्षी कोरोनामुळे लागू झालेल्या लाॅकडाऊनमुळे गुन्ह्यांचे प्रमाण कमी आहे. गतवर्षी एक विकृत घटना घडली पण त्यांनाही पोलिसांना पकडण्यात यश आले.
n जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांमध्ये २ वासनेच्या प्रकार घडल्या पण त्याही पोलिसांना आराेपींना पकडण्यात यश आले.
महिलाच ठरल्या विकृतीच्या शिकार
सध्या महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढू लागल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये विकृतीच्या शिकारींमध्ये महिलांचे प्रमाण आहे. काही जिल्ह्यांमध्ये महिलांपेक्षा अल्पवयीन मुलीचे प्रमाण आहे. रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये विकृत प्रकारामध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे अल्पवयीन मुलींचे प्रमाण खूप कमी आहे. महिलांचे प्रमाण का जास्त आहे याचा शाेध पोलीस घेत आहेत
जिल्ह्यातील बलात्कार
जानेवारी ००
फेब्रुवारी ०१
मार्च ००
एप्रिल ००
मे ००
जून ००
जुलै ०१
ऑगस्ट ००
कोरोनाकाळातही नजर
गतवर्षीपासून कोरोनाचे संकट राज्यभर सुरू आहे. हे कोरोनाचे संकट सुरू असतानाही रत्नागिरी जिल्ह्यात नोव्हेंबर २०२० मध्ये व फेब्रुवारी व जुलै २०२१ मध्ये ३ केसेस दाखल झाल्या हाेत्या. काेराेनाच्या काळात बंदाेबस्ताचा ताण असतानाही पाेलिसांनी आपल्या कर्तव्यात कसूर केलेला नाही. पाेलीस स्थानकात दाखल हाेणाऱ्या प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यातही पाेलीस अग्रेसर आहेत.