शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणातील उड्डाणपुलासाठी जानेवारी २०२६चा मुहूर्त!, गर्डर चढविण्याचे काम युद्धपातळीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 12:16 IST

जुन्या पिअर कॅप तोडण्याचे काम पूर्ण

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथे उड्डाणपुलाच्या कामाला गती आली असून, जानेवारी २०२६ पूर्वी हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या जुने पिअर तोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. आता नवीन पिअर कॅप उभारण्याच्या कामाला वेग आला आहे.पेढे-परशुराम ते खेरशेत या ३४ किलोमीटर दरम्यान चौपदरीकरणातील चिपळूण टप्प्यात बहादूरशेख नाका ते प्रांत कार्यालयापर्यंत उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. बहादूरशेखनाका येथून या पुलाचे काम पावसाळ्यात सुरू केले. मात्र, १६ ऑक्टोबर २०२३ रोजी या पुलाचा काही भाग कोसळल्यानंतर या कामातील काही त्रुटी प्राथमिकदृष्ट्या समोर आल्या. त्यानंतर पुलाचा आराखडा बदलण्यात आला.सध्या पूल उभारणीत ४० मीटरच्या गाळ्यांचे अंतर कमी करून ते आता २० मीटरवर ठेवले आहे. त्यासाठी तिथे अतिरिक्त पिअर उभारण्यात आले आहेत. पिअर कॅप उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, एकूण ९५ पिअर कॅपपैकी अर्ध्याहून अधिक पिअर कॅपचे काम पूर्ण केले आहे. त्यासाठी तीन टीम काम करत आहेत.आता उर्वरित पिअर कॅपवर गर्डर चढविण्यासाठी दोन क्रेन मागविण्यात आले असून, त्याआधारे महिनाभरात ३२ गर्डर चढविण्यात आले. अजूनही उर्वरित कामासाठी किमान नऊ महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने जानेवारी २०२६ पर्यंत हे काम पूर्ण होईल, असे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले आहे.

पॉवरहाऊस ब्लॅक स्पॉटच्या वाटेवरचिपळूण हद्दीतील पाग पाॅवरहाऊस येथील चौकातून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागते. आतापर्यंत येथे अनेक अपघात झाले असून, त्यात काहींना आपले प्राणही गमवावे लागले होते. सततच्या अपघाताच्या घटनांमुळे हा चौक भविष्यात ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखला जाण्याची भीती आहे.

  • पुलाची लांबी १,८४० मीटर
  • रुंदी ४५ मीटर
  • ४६ पिलर पुलासाठी उभारण्यात आले असून, हा पूल कोकणातील महामार्गावरील सर्वाधिक लांबीचा ठरला आहे.
टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणhighwayमहामार्ग