शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

युद्धाची झळ स्वयंपाकघरापर्यंत, खाद्यतेलाचा उडाला भडका; एका आठवड्यात किलोमागे १२ रुपयांची झाली वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 17:35 IST

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीत ३० टक्के दर वाढ

रत्नागिरी : अमेरिका-इराण युद्धाची झळ आता थेट स्वयंपाकघरापर्यंत पोहोचली आहे. युद्धामुळे खाद्यतेल पुरवठ्यात समस्या निर्माण झाली आहे. ज्या वस्तू आयात केल्या जात आहेत, त्या वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या दरात गेल्या आठवडाभरात प्रतिकिलो तब्बल बारा रुपयांची वाढ झाली आहे. दि. १ मार्च रोजी १३३ ते १३५ रुपये किलो दराने असणारे सोयाबीन खाद्यतेल सध्या १४५ ते १४७ रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. सोयाबीनचेही दर वाढले आहेत.भारत-अमेरिका व्यापार करारामुळे सोयाबीनच्या किमती ५०० रुपये प्रतिक्विंटल कमी झाल्या होत्या. मात्र, मध्य पूर्व देशातील युद्धामुळे व कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने सोयाबीनचा दर प्रतिक्विंटल सहा हजार रुपये झाला आहे. भारताने एप्रिल ते जुलै या कालावधीत ७५ हजार मेट्रिक टन सोयाबीन आयात करण्याचा साैदा केला होता. मात्र, युद्धामुळे तो रद्द झाला आहे. त्यामुळे आता रिफाइंड तेलाच्या किमती वाढल्या आहेत.आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीत ३० टक्के दर वाढ झाली असल्यामुळे ग्राहकांना याचा फटका बसत आहे. त्याशिवाय अतिवृष्टीमुळे यावर्षी सोयाबीनचे उत्पादन कमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत युद्ध थांबले नाही तर आणखी दरवाढ होण्याची भीती आहे.सोयाबीन, पामोलिन, सूर्यफूल यांसारख्या खाद्यतेलांची आयात मलेशिया, इंडोनेशिया, अर्जेंटिना, ब्राझील या देशांतून केली जाते. मात्र, मध्यपूर्व देशांतर्गत असलेल्या तणावात्मक परिस्थितीची झळ जलवाहतुकीलाही बसली आहे. जलवाहतुकीच्या खर्चात वाढ झाली असल्याने आयात होणाऱ्या खाद्यतेलाच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. वाहतुकीतील अडथळे, जहाजांच्या मार्गातील बदल व वाढलेला विमा खर्च यामुळे आयात वस्तूंमध्ये दरवाढ झाली आहे.

खाद्यतेलाचे प्रकार - पूर्वीचे दर - आताचे दर

  • सोयाबीन - १३३ - १४५
  • सूर्यफूल - १५७ - १६५
  • राइस ब्रँड - १३६ - १४०
  • शेंगदाणा - १५२ - १६०

सध्या उत्सव, सण, लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे खाद्यतेलासाठी वाढती मागणी आहे; परंतु मध्यपूर्व देशातील युद्धामुळे आयातीवर परिणाम झाल्याने खाद्यतेलाच्या किमती भडकल्या आहेत. - सूर्यकांत जाधव, विक्रेता

English
हिंदी सारांश
Web Title : War's Impact: Cooking Oil Prices Soar, ₹12/kg Increase in Week

Web Summary : The US-Iran conflict disrupts cooking oil supplies, raising prices. Soybean oil increased by ₹12/kg in a week due to import issues and rising crude oil costs. Reduced soybean production exacerbates the situation, threatening further price hikes if the conflict persists.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरOil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्प