शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri Crime: भक्तीशी अश्लील बोलला, दुर्वासने काढला वीरचा काटा; पोलिस अधीक्षकांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 14:04 IST

तिहेरी हत्याकांडप्रकरणी अधिक धागेदोरे लवकरच हाती

रत्नागिरी : सीताराम वीर हा माझ्याशी फोनवरून अश्लील संभाषण करीत असल्याचे प्रेयसी भक्ती हिनेच मला सांगितले होते. यामुळे आलेल्या रागातून आपण वीर याचा काटा काढला, असे दुर्वास दर्शन पाटील याने पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे या तिहेरी हत्याकांडातून आता लवकरच अधिक धागेदोरे हाती येतील, असे पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.लग्नात बाधा नको, म्हणून दुर्वास याने वायरने गळा आवळून भक्ती मयेकर हिचा खून केला. भक्ती १६ ऑगस्टपासून बेपत्ता असल्याने तिच्या भावाने रत्नागिरी पोलिस ठाण्यात बेपत्ताची तक्रार दिली होती. त्यानुसार शहर पोलिस तपास करीत असताना तिची हत्या दुर्वास याने केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला तसेच खुनासाठी मदत करणारे त्याचे साथीदार विश्वास पवार, नीलेश भिंगार्डे यांना अटक करण्यात आली. पोलिस चौकशीत दुर्वास याने सीताराम वीर याला बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची कबुली दिली तसेच वीर याच्या खुनाची माहिती राकेश जंगम याला होती. ती तो पोलिसांना देईल, अशी भीती वाटत असल्याने त्यालाही बारमध्ये ठार मारून त्याचे प्रेत आंबा घाटात दरीत टाकल्याचे दुर्वास याने कबूल केले. या तिहेरी हत्याकांडात आतापर्यंत दुर्वास पाटील, विश्वास पवार, सुशांत नरळकर, नीलेश भिंगार्डे असे चार आराेपी असल्याचे स्पष्ट झाले आहे. राकेश याचा मृतदेह आंबा घाटातील दरीत शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र, या घटनेला एक वर्ष होऊन गेले आहे. तसेच घनदाट जंगलामुळे त्याच्या शरीराचे अवशेष मिळण्यात अपयश आल्याचेही अधीक्षक बगाटे यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक बाबूराव महामुनी तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरेही उपस्थित होते.

दोषींवर कारवाई करणारएक वर्षापूर्वी हत्या केलेल्या राकेश जंगम यांच्या आईने आपला मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार वारंवार जयगड पोलिस ठाण्यातील निरीक्षक पाटील यांच्याकडे केली होती. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केले. राकेश याच्या खुनाला पोलिस निरीक्षक पाटील हेही जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी राकेशची आई वंदना जंगम यांनी केली आहे. याविषयी पोलिस अधीक्षक बगाटे म्हणाले की, यात जे जे दोषी असतील, त्यांच्यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल.

भक्ती प्रेग्नंट नव्हती?भक्तीच्या खुनाविषयी तपासात अनेक बाबी पुढे येत आहेत. पोलिसांच्या अहवालात भक्ती प्रेग्नंट असल्याचे नमूद करण्यात आले असले तरी पोस्टमार्टेममध्ये ती प्रेग्नंट नसल्याचे आढळून आल्याची बाबही पुढे येत आहे.